तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर चॅटिंगची गंमत वाढणार; 'हे' 7 धमाकेदार फीचर कमाल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 05:34 PM2023-06-24T17:34:57+5:302023-06-24T17:47:55+5:30

WhatsApp : 2023 मध्ये रिलीज झालेल्या 7 सर्वोत्तम WhatsApp फीसर्चबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

WhatsApp ने यावर्षी अनेक धमाकेदार फीचर्स सादर केले आहेत, यातील अनेक फीचर्स खरोखरच मस्त आहेत. 2023 मध्ये रिलीज झालेल्या 7 सर्वोत्तम WhatsApp फीसर्चबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. दमदार फीचर्समध्ये मल्टी डिव्हाईस फीचर, चॅट लॉक, एडिट मेसेज, हाय क्वालिटी फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड, व्हॉइस स्टेटस आणि स्टेटस लिंक प्रिव्ह्यू यांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

WhatsApp ने अकाऊंट अनेक डिव्हाईसवर वापरण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचे WhatsApp अकाऊंट चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर वापरू शकता. हे वापरण्यास अतिशय सोपं आहे आणि पुन्हा पुन्हा लिंक करण्याची आवश्यकता नाही.

चॅट लॉक फीचर देखील सर्वोत्तम फीचर आहे. आतापर्यंत तुम्ही चॅट लपवण्यासाठी आर्काइव्ह करायचा किंवा तुम्हाला WhatsApp पूर्णपणे लॉक करावे लागाचे. आता तुम्ही फक्त WhatsApp चॅट लॉक करू शकता.

एखादं स्पेशल चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला चॅट कॉन्टॅक्ट्सच्या प्रोफाईल इंफोवर जावं लागेल. चॅट लॉक पर्यायावर खाली स्क्रोल करा आणि तुमच्या फिंगरप्रिंटसह ही चॅट लॉक करा. यामुळे तुमच्याशिवाय दुसरं कोणीच चॅट वाचू शकत नाही.

WhatsApp वर या फीचरची खूप गरज होती. यापूर्वी टाईप करून चुकीचा मेसेज पाठवला तर तो डिलीट करण्याचा पर्याय होता. परंतु आता ते एडिट केला जाऊ शकतो. समजा तुमच्याकडे एखादा मेसेज असेल ज्यामध्ये टायपिंग मिस्टेक असेल तर तो निवडा.

आता वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन-डॉटच्या मेनूमधून 'एडिट' पर्याय निवडा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त पहिल्या 15 मिनिटांत मेसेज एडिट करू शकता आणि एडिट मेसेजच्या खाली एक एडिटचा टॅग असेल.

WhatsApp वर फोटो शेअर करताना फोटो ब्लर शेअर होतो. पण यावरही WhatsApp ने उपाय शोधला आहे. WhatsApp स्नॅपशॉट वर जा, स्टोरेज आणि डेटा पाहा आणि मीडिया अपलोड गुणवत्ता अंतर्गत, अपलोड गुणवत्तेसाठी 'हाय क्वालिटी' निवडा.

WhatsApp वरून थेट व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी, युजर्स WhatsApp च्या कॅमेऱ्याच्या बाजूला असलेलं बटण दाबून धरायचं. पण आता डेडिकेटेड व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये एक वेगळं बटण आहे जे तुम्हाला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास मदत करतं.

WhatsApp वर व्हिडीओ स्टेटस आणि स्टेटस अपडेट करण्याचा पर्याय होता. पण आता तुम्ही व्हॉइस स्टेटसही शेअर करू शकता. WhatsApp वर 'स्टेटस' टॅबवर जा आणि तळाशी 'पेन्सिल' आयकॉन निवडा. पुढील स्क्रीनवर, 'मायक्रोफोन' चिन्हावर टॅप करा आणि 30 सेकंदांपर्यंत तुमचा व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करणे सुरू करा.

WhatsApp URL वरून एका फीचर्ड इमेज आणून एक प्रीव्ह्यू इमेज जोडतो. लिंकवर क्लिक करणाऱ्या व्यक्तीला थंबनेल पाहून एक अंदाज येईल. लिंकमध्ये नेमका कोणता विषय आहे याची थोडक्यात माहिती मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.