whatsapp advanced search mode and linked device feature spotted
WhatsApp मध्ये लवकरच दोन नवीन फीचर्स, अनेक डिव्हाइसवर वापरता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 03:32 PM2020-07-24T15:32:04+5:302020-07-24T16:22:37+5:30Join usJoin usNext इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये नवीन अॅडव्हॉन्स सर्च ऑप्शन दिला जाणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर देण्यात आले आहे. WABetainfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअॅप 2.20.118 अँड्रॉइड बीटामध्ये अॅडव्हॉन्स सर्च मोडचा ऑप्शन दिला आहे. अहवालानुसार व्हॉट्सअॅप आपल्या यूजर इंटरफेसवर काम करत आहे. या फीचरअंतर्गत, युजर्स मेसेज टाइपच्या माध्यातून व्हॉट्सअॅपवर सर्च करू शकतील. WABetainfo ने स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. येथे फीचर सर्च मोडमध्ये फोटो, व्हिडिओ, लिंक्स, गिफ्ट्स, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्सचा ऑप्शन दिसू शकतो. म्हणजेच, या कॅटगरीमध्ये युजर्ससाठी सर्च करणे सोपे होईल. सध्या या फिचरचे डेव्हलपमेंट सुरू आहे. या फीचर्सला काही काळानंतर कंपनी अंतिम बिल्डद्वारे युजर्सपर्यंत अपडेट आणू शकते. हे फीचर फक्त अँड्रॉईडसाठी असणार की आयफोन यूजर्सना सुद्धा दिले जाणार, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. व्हॉट्सअॅपशी संबंधित दुसर्या अहवालाविषयी बोलताना एक मोठे फीचर टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. लिंक्ड डिव्हाइसच्या या फीचरनुसार, येत्या काळात व्हॉट्सअॅप एकाचवेळी एकापेक्षा जास्त स्मार्टफोनमध्ये वापरले जाऊ शकते. WABetainfo द्वारे शेअर केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये असे दिसून येते की, व्हॉट्सअॅप अकाऊंट वेगवेगळ्या डिव्हाइससोबत सिंक करण्याचा ऑप्शन आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅपला सिंक करून एकाच वेळी एकापेक्षा जास्त स्मार्टफोनमध्ये वापरता येऊ शकेल. ही दोन्ही फीचर्स एकाचवेळी लाँच करण्याची शक्यता आहे. कारण, व्हॉट्सअॅपची ही दोन्ही फीचर्स बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आली आहेत. पण, सध्या या दोनही फिचर्स टेस्टिंगच्या टप्प्यात आहेत.टॅग्स :व्हॉट्सअॅपतंत्रज्ञानWhatsApptechnology