भन्नाट! WhatsApp प्रोफाइल फोटोत दिसणार तुमचा नवा 'अवतार', 'हे' कमाल फीचर दाखवणार जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 03:50 PM2022-10-21T15:50:40+5:302022-10-21T15:57:29+5:30

WhatsApp : एका मजेदार फीचरची एन्ट्री झाली आहे. हे फीचर आल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा दुप्पट होणार आहे. WhatsApp च्या या नवीन फीचरचे नाव अवतार (Avatar) आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. यामध्ये आता आणखी एका मजेदार फीचरची एन्ट्री झाली आहे. हे फीचर आल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा दुप्पट होणार आहे. WhatsApp च्या या नवीन फीचरचे नाव अवतार (Avatar) आहे.

अवतार फीचरच्या मदतीने युजर प्रोफाइल पिक्चरमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीला आपला नवीन अवतार दाखवू शकतात. युजर WhatsApp सेटिंगमध्ये जाऊन डिजिटल एक्सप्रेशनच्या अवतार स्टिकर्सला प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट करू शकतात. नवीन फीचरची माहिती WhatsApp ला ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo ने ट्वीट करून दिली आहे.

WABetaInfo ने आपल्या ट्विटमध्ये एक स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही अवतारचे नवीन स्टिकर पॅकला पाहू शकता. नवीन अपडेट नंतर WhatsApp ऑटोमॅटिकली नवीन स्टिकर पॅक क्रिएट करेल आणि याला सहज फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत तुम्हाला याला शेअर करू शकता.

अवतारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला तुमच्या मूडनुसार, कोणताही प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट करू शकता. WAbetaInfo च्या माहितीनुसार, कंपनी या फीचरला सध्या काही निवडक बीटा यूजर्ससाठी रोलआउट करीत आहे. बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ग्लोबल यूजर्ससाठी याला स्टेबल व्हर्जनला रोलआउट केले जाईल.

जर तुम्ही बीटा टेस्टर असाल आणि WhatsApp सेटिंग्समध्ये तुम्हाला अवतारचा ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही याला यूज करू शकताWhatsApp चे हे अपकमिंग फीचर युजर्सची सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी खूपच कामाचं असू शकतं. या फीचरची डिमांड खूप आधीपासून होत होती.

व्हॉट्सॲपअपडेट्सची माहिती देणारा प्लॅटफॉर्म WABetaInfo च्या माहितीनुसार, मेटाच्या ओनरशीपचे ॲप सध्या 512 पार्टीसिपेंट्सच्या ग्रुप लिमिट्समध्ये बदलाची टेस्टिंग केली जात आहे. आता ॲडमिन्सला एका ग्रुपमध्ये 1024 पर्यंत मेंबर्सचा समावेश करण्याचा ऑप्शन दिला जात आहे.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर लागोपाठ नवीन फीचर्सचा फायदा युजर्सना मिळत आहे. आता याच्या ग्रुप मेसेजिंग सिस्टमध्ये मोठा बदल केला जात आहे. आधी एकाच ग्रुपमध्ये फक्त 256 मेंबर्सचा समावेश केला जाऊ शकत होता. आता जास्त संख्या वाढवून 512 करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडले जाऊ शकतात. या नवीन लिमिटची टेस्टिंग केली जात आहे. याप्रमाणे एकाचवेळी हजारांहून जास्त लोकांपर्यंत पोहोचले जाऊ शकते. तसेच युजर्ससाठी ग्रुप मेसेजिंगचा एक्सपीरियन्स आणखी चांगला होणार आहे.

व्हॉट्सॲपअपडेट्सची माहिती देणारा प्लॅटफॉर्म WABetaInfo च्या माहितीनुसार, मेटाच्या ओनरशीपचे ॲप सध्या 512 पार्टीसिपेंट्सच्या ग्रुप लिमिट्समध्ये बदलाची टेस्टिंग केली जात आहे. आता ॲडमिन्सला एका ग्रुपमध्ये 1024 पर्यंत मेंबर्सचा समावेश करण्याचा ऑप्शन दिला जात आहे.

हे फीचर बीटा युजर्ससोबत टेस्ट केले जात आहे. तसेच निवडक बीटा युजर्सला या फीचरचा फायदा मिळत आहे. प्रायव्हसी देताना व्हॉट्सॲपने आपल्या व्ह्यू वन्स फीचर मध्ये बदल केला आहे. आतापर्यंत व्ह्यू वन्स फीचर सोबत पाठवण्यात आलेले फोटोज किंवा व्हिडिओजच्या स्क्रीनशॉट्ससाठी पाठवले जात होते.