WhatsApp Chat will be automatically deleted; new feature soon
WhatsApp कमाल करणार; चॅट आपोआपच गायब होणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:36 PM2019-10-02T15:36:37+5:302019-10-02T16:15:56+5:30Join usJoin usNext मॅसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅप नवनवीन फिचर्स आणून युजर्सना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आयएमओ, टेलिग्रामसारख्या अॅपकडून कडवी स्पर्धा मिळत असताना या बाजारात टिकून राहणे कठीण जात आहे. व्हॉट्सअॅपच्या फिचरवर लक्ष ठेवणारी साईट WABetaInfo यांनी सांगितले की फेसबूकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअॅप एका अशा भन्नाट फिचरवर काम करत आहे की, पाठविलेला मॅसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मॅसेज केला तर त्या मॅसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये डिसअॅपीअर्ड हे फिचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. हे फिचर आधिपासूनच टेलिग्राम अॅपवर आहे. व्हॉट्सअॅपवर सध्या पाठविलेले मॅसेज पाठवणाऱ्याकडून डिलीट करता येतात. यावेळी मॅसेज डिलिटेड असे दिसते. परंतू नव्या फिचरमध्ये हे दिसणार नाही. टाईम एक्स्पायर असे दिसण्याची शक्यता आहे. टॅग्स :व्हॉट्सअॅपWhatsApp