एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:10 PM2024-11-15T15:10:20+5:302024-11-15T15:24:06+5:30

WhatsApp ने एक नवीन फीचर जारी केलं आहे, जे iOS आणि Android युजर्सना मिळेल. कंपनीने हे फीचर ग्लोबली रोलआऊट केलं आहे.

WhatsApp ने एक नवीन फीचर जारी केलं आहे, जे iOS आणि Android युजर्सना मिळेल. कंपनीने हे फीचर ग्लोबली रोलआऊट केलं आहे.

WhatsApp ड्राफ्ट मेसेजबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत. ज्याच्या मदतीने, युजर्स त्यांचे अपूर्ण मेसेज ट्रॅक करण्यास सक्षम असतील आणि ते पूर्ण देखील करू शकतील.

या फीचरमध्ये कोणताही अपूर्ण मेसेज हा ड्राफ्टच्या लेबलसह दिसेल आणि ते चॅट मूव्ह करून टॉपवर नेईल. यामुळे आपल्याला तो मेसेज सहज एक्सेस करता येईल.

म्हणजेच तुम्ही एखादा मेसेज अपूर्ण ठेवला तर तो आपोआप या फीचरमुळे चॅट टॉपवर पोहोचेल आणि त्यावर तुम्हाला ड्राफ्टचं लेबलही दिसेल.

यामुळे तुम्हाला अपूर्ण मेसेजची आठवण होईल. हे फीचर अशा लोकांसाठी खूप उपयुक्त आहे जे अनेकदा मेसेज टाईप करतात आणि पाठवायला विसरतात.

WhatsApp वर एकाच वेळी अनेक जणांशी चॅट करताना लोकांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, ड्राफ्ट मेसेज पहिला इनव्हिजिबल असायचा.

आता असं होणार नाही. कोणत्याही ड्राफ्ट मेसेजसह तुम्हाला ड्राफ्टचं आता लेबलही दिसेल, जे हिरव्या रंगाचं असेल. तसंच या चॅटही समोर येईल.

अशाप्रकारे, तुम्ही कोणत्याची चॅटमध्ये ड्राफ्ट असलेल्या मेसेजची माहिती सहजपणे मिळवू शकाल आणि ते संभाषण पूर्ण करू शकाल.

अलीकडेच कंपनीने या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फीचर्स जोडली आहेत. या वर्षी अँड्रॉइड युजर्ससाठी UI पूर्णपणे बदलण्यात आला आहे.