सावधान! WhatsApp, Gmail अन् गुगल ड्राइव्हचा डेटा होईल गायब; 'या' ट्रीक्सचा वापर करुन स्टोरेज वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 09:37 PM2024-09-11T21:37:58+5:302024-09-11T22:00:39+5:30

Google तुम्हाला 15GB पर्यंत मोफत स्टोरेज देते. व्हॉट्सॲप बॅकअपमध्ये सेव्ह केलेला डेटाचाही यामध्ये समावेश आहे. 15GB ची मर्यादा ओलांडल्यास तुम्ही WhatsApp, Gmail, Google Drive मध्ये फोटो, व्हिडीओ, फाइल्स यांचा बॅकअप घेऊ शकणार नाही.

सध्या सगळ्यांकडेच मोबाईल फोन आहेत, मोबाईल आला की आपल्याकडे व्हॉट्सअप, जीमेल सारखे अॅप्स असतात. या अॅप्सवरील डेटामुळे आपले स्टोरेज लगेच फुल होते. यामुळे आपल्या फोनमधील कमी बॅकअप स्टोरेजबद्दल आपल्याला काळजी असते.

व्हॉट्सॲपचा बॅकअप घेताना, गुगल ड्राइव्हवर फाइल्स अपलोड करताना किंवा गुगल फोटोमध्ये फोटो आणि व्हिडीओ अपलोड करताना तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा Google ने दिलेली 15GB क्लाउड स्टोरेजची मोफतची मर्यादा संपते. ही मर्यादा संपली असेल किंवा संपणार असेल, तर Google One तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

Google One प्लॅन अंतर्गत क्लाउड स्टोरेज देते. मात्र, ही योजना थोडी महाग आहे. तुम्हाला डेटाचा बॅकअप घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नसल्यास, तुम्ही Google One Lite योजनेचा लाभ घेऊ शकता.

Google ने One Lite योजना आणली आहे, ही योजना स्टोरेजसाठी लोकांसाठी परवडणारा पर्याय बनेल. हे खरेदी केल्यानंतर, तुम्हाला डेटा बॅकअपसाठी अतिरिक्त क्लाउड स्टोरेज मिळेल.

नवीन Google One Lite योजना 30GB क्लाउड स्टोरेजचा लाभ देईल. तुम्ही ही योजना निवडल्यास, तुम्हाला 30GB ची वाढीव स्टोरेज मर्यादा मिळेल. या प्लॅनमध्ये काही फिचर उपलब्ध नसतील.कंपनी या प्लॅनसाठी एक महिन्याची मोफत चाचणी देखील देत आहे. व्हॉट्सॲपशिवाय जीमेल, गुगल फोटोज आणि गुगल ड्राइव्हचा बॅकअपही घेता येईल.

Google One Lite प्लॅनची ​​किंमत ५९ रुपये प्रति महिना आहे, यामध्ये तुम्हाला 30GB स्टोरेज मिळेल. Google देखील 100GB प्लॅन ऑफर करते, याची किंमत प्रति महिना ११८ रुपये आहे. जर तुम्ही स्टोरेजच्या कमतरतेमुळे अडचणीत असाल आणि डेटा बॅकअप गमावण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही या योजनेचा विचार करू शकता.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही Google One Lite प्लॅनची ​​वार्षिक योजना देखील घेऊ शकता.याची किंमत ५८९ रुपये आहे. कंपनी Google One Lite सबस्क्रिप्शनवर काही ऑफर देखील देत आहे. तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही या स्वस्त पर्यायांचा लाभ घेऊ शकता.

Google One ही एक प्रीमियम योजना आहे, यात 2TB क्लाउड स्टोरेज ऑफर करते. यात नवीन AI फिचर आहेत, Gemini AI सपोर्ट आणि Google Photos मधील मॅजिक एडिटर फिचर आहेत.यासाठी तुम्हाला दरमहा १,९५० रुपये खर्च करावे लागतील.