WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, 'हे' 6 नवे फीचर कमाल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 03:42 PM2022-04-03T15:42:17+5:302022-04-03T15:48:37+5:30

WhatsApp 6 cool features : युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 6 दमदार नवीन फीचर्स आणले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया...

WhatsApp हे सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालं आहे. जर काही कारणास्तव WhatsApp अवघ्या पाच दहा मिनिटांसाठी जरी डाऊन झालं तरी आपण लगेचच त्रस्त होतो. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्स चॅटिंग आणखी गंमतीशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स आणत असतं. आताही आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 6 दमदार नवीन फीचर्स आणले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया...

WhatsApp चे हे फीचर युजर्संना व्हॉईस मेसेज चॅटबाहेर ऐकण्याची सुविधा देणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, युजर व्हॉईस मेसेज ऐकत फोनमध्ये मल्टीटास्किंग सोबत दुसऱ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करू शकेल.

पॉज किंवा रिज्यूम करा रेकॉर्डिंग फीचरच्या मदतीने युजरला व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करताना काही अडचण आली तर त्याला थांबवून त्याच जागेपासून पुढे कंटिन्यू करता येईल.

रिमेंबर प्लेबॅक हे फीचर आल्याने युजर व्हॉईस मेसेज ऐकताना पॉज करू शकता किंवा त्याला पुन्हा त्याचजागेपासून सुरू करू शकतात.

फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्डेड मेसेज युजर्सला 1.5x आणि 2x स्पीडवर व्हॉईस मेसेज प्ले करण्याची सुविधा देतं.

वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन युजर्सला साउंडचे व्हिज्यूअल्स रिप्रेजेंटेशन देईल. यामुळे युजर्संना रेकॉर्डिंगमध्ये खूपच मदत मिळेल.

ड्राफ्ट प्रीव्ह्यू युजर्सला व्हॉईस नोट पाठवण्याआधी ती ऐकण्याची संधी देत आहे. म्हणजेच युजर ते पाठवण्याआधी एकदा ऐकून एडीट करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.