WhatsApp चे नवीन फीचर... प्रायव्हसी होईल अधिक मजबूत अन् युजर्सचा एक्सपीरियंसही बदलेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 09:33 IST2025-02-04T09:10:43+5:302025-02-04T09:33:36+5:30

WhatsApp : व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲपचे भारतासह जगभरात लाखो युजर्स आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर (WhatsApp) एक नवीन फीचर आले आहे. या फीचरचा फायदा अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही युजर्ससाठी होणार आहे. दरम्यान, व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सॲपचे भारतासह जगभरात लाखो युजर्स आहेत.

व्हॉट्सॲपचे अपकमिंग फीचर्स ट्रॅक करणारी वेबसाइट Wabetainfo ने म्हटले आहे की, व्ह्यू वन्स मीडियाला (View Once Media) लिंक्ड डिव्हाइसवर अॅक्सेस करता येतो. सध्या हे फीचर काही बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे आणि येत्या काळात त्यात आणखी लोकांचा समावेश केला जाईल.

व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरचे नाव व्ह्यू वन्स मीडिया ऑन लिंक्ड डिव्हाइसेस (View Once Media on Linked Devices) असे म्हटले जाते. याचा फायदा असा होणार आहे की, लिंक्ड डिव्हाइस अंतर्गत कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवर व्ह्यू वन्स मीडिया देखील पाहता येईल. पूर्वी ते फक्त प्रायमरी डिव्हाइसवर दिसत होते.

लेटेस्ट अपडेटमध्ये व्हॉट्सॲपने व्ह्यू वन्स फीचरची लिमिट पाहिली आणि ती काढून टाकली. या अपडेटची मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती आणि आता ते फीचर बीटा व्हर्जनमध्ये आले आहे. लवकरच हे फीचर स्टेबल व्हर्जनसाठी रिलीज केले जाणार आहे.

Wabetainfo ने म्हटले आहे की, या नवीन फीचरच्या अपडेटनंतरही कंपनीने युजर्सची गोपनीयता सुरक्षित राखण्याचा दावा केला आहे. या प्लॅटफॉर्मवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुविधा उपलब्ध आहे. तसेच, त्याचे स्क्रीनशॉट घेणे देखील शक्य होणार नाही.

व्हॉट्सअॅप व्ह्यू वन्स फीचर अंतर्गत, युजर्स आपल्या फोटोंची गोपनीयता सुरक्षित ठेवू शकतात. व्ह्यू वन्स अंतर्गत पाठवलेले फोटो रिसीव्हरने एकदा पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतात, या फोटोंचे स्क्रीनशॉट घेता येत नाहीत.

लिंक्ड डिव्हाइसेसवर व्ह्यू वन्स मीडिया वापरण्यासाठी युजर्सना बीटा व्हर्जन इन्स्टॉल करावे लागेल. यासाठी, सर्वात आधी युजर्सला बीटा टेस्टर्स म्हणून रजिस्टर्ड करावे लागेल, त्यानंतर जर युजर्स पात्र असतील तर त्यांनी ही सुविधा मिळेल.