WhatsApp करतं तुमच्या भाषेत काम, कसं ते जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 03:47 PM 2019-03-27T15:47:32+5:30 2019-03-27T16:03:54+5:30
WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करतात. WhatsApp ही युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp चा वापर हा केवळ इंग्रजी नाही तर स्थानिक भाषेतही करता येतो. WhatsApp हे 10 स्थानिक भाषांना सपोर्ट करतं.
WhatsApp हिंदी, मराठी, तमिळ, पंजाबी, बंगाली, उर्दू, गुजराती, मल्ल्याळम भाषांसह अन्य काही भाषांना सपोर्ट करतं. अॅन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप कशापद्धतीने स्थानिक भाषेत वापरता येतं हे जाणून घेऊया. अॅन्ड्रॉईड आणि आयफोनमध्ये ही प्रकिया वेगवेगळी असते.
अॅन्ड्रॉईड सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
तीन डॉटवर क्लिक केल्यावर सेटींगमध्ये जा.
Chats या पर्यायावर क्लिक करा.
Chats वर क्लिक केल्यानंतर App Language चा एक पर्याय दिसेल.
App Language वर क्लिक करून तुम्ही तुमचा स्थानिक भाषेचा अथवा तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडू शकता.
आयफोन आयफोनमध्ये सर्वप्रथम सेटींग अॅपवर क्लिक करा. त्यानंतर जनरलवर क्लिक करा.
Language and Region वर गेल्यानंतर त्यातील तुम्हाला हव्या असलेल्या भाषेचा पर्याय निवडा.
स्थानिक भाषेचा पर्याय निवडताना व्हॉट्सअॅप हे हिंदी, पंजाबी, बंगाली, मराठी तमिळ, उर्दू, गुजराती, मल्ल्याळम या भाषांना सपोर्ट करतं हे लक्षात ठेवा.