तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, एकाच अकाऊंटचा 4 ठिकाणी वापर करता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 03:15 PM 2021-02-15T15:15:59+5:30 2021-02-15T15:42:09+5:30
WhatsApp News : व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग अधिक मजेशीर व्हाव यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्सचं चॅटिंग अधिक मजेशीर व्हाव यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. सध्या कंपनी अशाच काही भन्नाट फीचर्सवर काम करत आहे.
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण एकाच व्हॉट्सअॅप अकाऊंटचा चार ठिकणी वापर करता येणार आहे. मल्टी डिव्हाईस असं या फीचरचं नाव असून हे युजर्ससाठी येत्या काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
मल्टी डिव्हाईस फीचर अंतर्गत एकाच अकाऊंटला अनेक डिव्हाईस म्हणजे अनेक ठिकाणी अॅक्सेस मिळणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्स गेल्या काही दिवसांपासून या हटके फीचरची वाट पाहत होते.
व्हॉट्सअॅपच्या या फीचरच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक डिव्हाईसवर एका अकाऊंटचा वापर करण्यात येणार आहे. या मल्टी डिव्हाईस सपोर्टचा एक भाग एक फीचरच्या रुपात स्पॉट करण्यात आले आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, iOS साठी WhatsApp बीटा 2.21.30.16 मध्ये एक लॉगआऊट फीचर दिसलं आहे. हे फीचर मल्टी डिव्हाईस सपोर्टचा भाग असणार आहे. या द्वारे एक व्यक्ती विविध ठिकाणी कनेक्टेड डिव्हाईसशी लॉगआऊट करू शकणार आहे.
नवीन सर्व्हिसवरून एक व्हिडीओ डेमो दाखवला आहे. हे लिंक्ड डिव्हाईस इंटरफेसमध्ये देण्यात आलेल्या डिलीट अकाऊंट पर्यायाला रिप्लेस करू शकतो. फायदा असल्याने हे फीचर युजर्सच्या पसंतीस पडू शकतं.
या फीचरचा वापर करण्यासाठी ही सर्व्हिस युजर्स त्यांच्या अकाऊंटला दुसऱ्या डिव्हाईसला लॉगआऊट करण्यास मदत करू शकणार आहे. रिपोर्टमध्ये एकाच अकाऊंटला चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये अॅक्सेस केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे.
ही मर्यादा पुढे जाऊन कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. या फीचरसाठी प्रायमरी डिव्हाईसवर इंटरनेट कनेक्शनची गरज नसणार आहे. त्यामुळे लॉगआऊट फीचरद्वारे युजर्स अकाऊंटला वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये लॉगआऊट करू शकतील.
रिपोर्टमध्ये हे फीचर कोणत्याही अडचणीविना WhatsApp आणि WhatsApp Business अकाऊंटमध्ये काम करत असल्याचं म्हटलं आहे. WhatsApp च्या iOS बीटा व्हर्जनवर हे उपलब्ध करण्यात आलं आहे. मात्र हे आता पब्लिक बीटा व्हर्जनवर उपलब्ध नाही. याला लवकरच अँड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध केलं जाऊ शकतं.
WhatsAppने ते आणखी एका नवीन फीचरवर काम करत असून mention badge असं त्याचं नाव असल्याचं म्हटलं आहे. हे फीचर ग्रुप चॅट्ससाठी आणले जाणार आहे. कंपनी लवकरच हे फीचर आणू शकते.
एका रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपने नवीन फीचर रोलआऊट करणं सुरू केलं आहे. ज्याचं नाव Mute Video आहे. या फीचरमध्ये युजर्स सेंड केल्या जाणाऱ्या व्हिडीओमध्ये आपल्याकडून आवाज बंद करू शकतो.
जर युजर्स व्हिडीओ म्यूट करीत असेल तर तो व्हिडीओ पाठवण्याआधी फक्त स्पीकर आयकॉनवर टॅप करावं लागणार आहे. WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
व्हॉट्सअॅपच्या मदतीने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅप hii पाठवा आणि नोकरी मिळवा अशी एक योजना आली आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सरकारने ही योजना आणली आहे.
व्हॉट्सअॅपवर हाय पाठवल्यानंतर मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या मिळणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology ) बुधवारी लाँच केलेल्या केलेल्या कृत्रिम-बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळे हे सहज शक्य होणार असल्याची माहिती मिळत आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology ) बुधवारी लाँच केलेल्या केलेल्या कृत्रिम-बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळे हे सहज शक्य होणार असल्याची माहिती मिळत आहे.
7208635370 या नंबर Hi पाठवून मजूर सहज संपर्क साधू शकतात. एखाद्या मजूराने व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर मेसेज पाठवल्यानंतर पोर्टल त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाविषयी माहिती घेईल.
कोरोनाच्या संकटात अनेक मजूरांनी आपलं उत्पन्नाचं साधन गमावलं. या पोर्टलवर भारतातील MSME चा संपूर्ण नकाशा आहे. नोकरीची उपलब्धता आणि त्यांना आवश्यक असलेलं कौशल्य वापरून हे पोर्टल त्यांच्या प्रांतातील संभाव्य रोजगाराच्या संधी असलेल्या मजुरांशी जोडले जाईल.