तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp मध्ये आला खास Do Not Disturb मोड; 'असा' होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 02:31 PM2022-11-11T14:31:00+5:302022-11-11T14:40:10+5:30

WhatsApp Do Not Disturb : कंपनीने आता Do Not Disturb API आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला सहज कळू शकेल की, डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्समुळे कोणाचा कॉल मिस केला आहे.

WhatsApp जगभरातील कोट्यवधी युजर्ससाठी सर्वात जास्त पसंतीचे इन्स्टेंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी युजर फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासोबत आपले फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सला व्हाईस आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे कनेक्ट होऊ शकतात. आपल्या युजर्सचा एक्सपीरियन्स आणखी चांगला करण्यासाठी कंपनी नेहमीच नवीन नवीन फीचर आणत असतं.

कंपनीने आता Do Not Disturb API आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला सहज कळू शकेल की, डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्समुळे कोणाचा कॉल मिस केला आहे. WhatsApp मधील या नवीन फीचरची माहिती WABetaInfo ने ट्वीट करून दिली आहे. ट्विटमध्ये WhatsApp च्या या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे.

या फीचरला तुम्ही फोनच्या सेटिंग्समध्ये जावून ॲक्टिवेट करू शकता. यानंतर तुमच्या कोणत्याही फ्रेंड किंवा फॅमिली मेंबरला काही सेकंदासाठी व्हॉट्सॲप कॉल करण्यास सांगा. कॉल मिस झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला 'Silenced by Do Not Disturb' चे लेबल दिसेल. असे झाले तर समजून जा की, तुमच्या फोनवर हे फीचर ॲक्टिवेट झाले आहे.

कंपनी या फीचरला सध्या बीटा यूजर्ससाठी रोलआउट करीत आहे. आगामी दिवसात स्टेबल व्हर्जन सुद्धा रोलआउट केले जाऊ शकते. व्हॉट्सॲप बीटा यूजर्ससाठी ग्रुप चॅटचे एक नवीन फीचर रोलआउट करीत आहे. हे फीचर जास्त मेंबर्सच्या ग्रुप्सच्या चॅट नोटिफिकेशन्सला ऑटोमॅटिक ऑफ करते.

काही दिवसांपूर्वी कंपनीने ग्रुपमध्ये 1024 मेंबर्सला जोडणारे फीचर्स रोलआउट केले होते. यानंतर आता मोठ्या ग्रुप्ससाठी नोटिफिकेशन्सला ऑटोमॅटिकली म्यूट करणारे फीचर रोलआउट करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी दिवसात कंपनी या फीचरचे स्टेबल व्हर्जन ग्लोबल युजर्ससाठी रोलआउट करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

WhatsApp वर आता फोटो पाठवण्यापूर्वी इमेज ब्लर करता येणार आहे. WhatsApp ने आपल्या डेस्कटॉप बीटा युजर्ससाठी नवीन इमेज ब्लरिंग टूल आणलं आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, या नवीन टूलने युजर्स संवेदनशील चॅट किंवा माहिती ब्लर करू शकतील. या टूलला ब्लर टूल असं नाव देण्यात आलं आहे.

WB ने या नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ब्लर टूल कसं कार्य करेल ते दाखवलं आहे. या टूल अंतर्गत, युजर्स कोणता भाग नेमका ब्लर करायचा आहे हे सिलेक्ट करू शकतात. जो भाग ब्लर करायचा आहे तो भाग सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला हे फीचर मिळाले असेल तर तुम्ही फोटो पाठवून प्रयत्न करू शकता.

फोटो पाठवण्यापूर्वी तुम्हाला ब्लर बटण दिसल्यास तुम्ही ते वापरून पाहू शकता. जर तुम्हाला हे फीचर मिळाले नसेल तर तुम्ही थोडी वाट पाहा. आणखी एका मजेदार फीचरची एन्ट्री झाली आहे. हे फीचर आल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा दुप्पट होणार आहे. WhatsApp च्या या नवीन फीचरचे नाव अवतार (Avatar) आहे.

अवतार फीचरच्या मदतीने युजर प्रोफाइल पिक्चरमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीला आपला नवीन अवतार दाखवू शकतात. युजर WhatsApp सेटिंगमध्ये जाऊन डिजिटल एक्सप्रेशनच्या अवतार स्टिकर्सला प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट करू शकतात. WABetaInfo ने आपल्या ट्विटमध्ये एक स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही अवतारचे नवीन स्टिकर पॅकला पाहू शकता.

नवीन अपडेट नंतर WhatsApp ऑटोमॅटिकली नवीन स्टिकर पॅक क्रिएट करेल आणि याला सहज फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत तुम्हाला याला शेअर करू शकता. अवतारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला तुमच्या मूडनुसार, कोणताही प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट करू शकता. WAbetaInfo च्या माहितीनुसार, कंपनी या फीचरला सध्या काही निवडक बीटा युजर्ससाठी रोलआउट करीत आहे.

जर तुम्ही बीटा टेस्टर असाल आणि WhatsApp सेटिंग्समध्ये तुम्हाला अवतारचा ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही याला यूज करू शकताWhatsApp चे हे अपकमिंग फीचर युजर्सची सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी खूपच कामाचं असू शकतं. या फीचरची डिमांड खूप आधीपासून होत होती.