WhatsApp ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल होणार? कंपनीकडून नवीन फंक्शनवर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:22 PM2021-11-07T15:22:15+5:302021-11-07T15:32:34+5:30

WhatsApp : Community फीचरला WhatsAp च्या लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.21.21.6 मध्ये पाहिले होते. XDA Developers ने याबाबत रिपोर्ट दिला आहे.

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) एका नवीन फंक्शनवर काम करत आहे. यामुळे ग्रुप अॅडमिनला ग्रुपमध्ये अधिक पॉवर दिली जाणार आहे. या फंक्शनला Community फीचर म्हटले जात आहे. याला पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये XDA Developers ने स्पॉट केले होते.

Community फीचरमुळे ग्रुप अ‍ॅडमिन्सला ग्रुपमध्ये अधिक पॉवर मिळेल. याच्या मदतीने ग्रुपमध्येही ग्रुप तयार करता येतात. Community फीचरला WhatsAp च्या लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.21.21.6 मध्ये पाहिले होते. XDA Developers ने याबाबत रिपोर्ट दिला आहे.

रिपोर्टनुसार, Community मध्ये लिंक किंवा क्यूआर (QR) कोडद्वारे निमंत्रण देण्याची व्यवस्था असू शकते. यामुळे दुसरे युजर्स यामध्ये ज्वाइन होऊन सहभागी होऊ शकतात. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, WhatsApp युजर्स लिंकद्वारे Community ज्वाइन करू शकतात.

Community फीचरच्या माध्यमातून WhatsApp दुसरे मेसेजिंग प्लॅटफॉर्म जसे की Telegram आणि Signal या सारख्या अॅपमध्ये असलेले अंतर भरून काढायचे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली होती. यानंतर युजर्सनी हा प्लॅटफॉर्म सोडून इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर जाण्यास सुरुवात केली होती.

Community फीचरसह अ‍ॅडमिनजवळ ग्रुप्ससंबंधी अधिक कंट्रोल होऊ शकतो. यामुळे त्यांना Community मध्ये मेसेज करण्यासाठी एक चॅनेल मिळू शकते. तसेच अॅडमिनला Community मॅनेजर्ससारखे जास्त रोल्स दिले जाऊ शकतात.

अनेक लोक असेही म्हणत आहेत की, ग्रुप्स नावाला Community सोबत नवीन अपडेटमध्ये रिप्लेस केले जाईल. हे फंक्शन सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा कोडमध्ये दिसत आहे. याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, WhatsApp आपल्या नियमांच्या बाबतीत दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकॉउंट बंद केले होते. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये देखील कंपनीने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे.

आता सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने 22 लाखांपेक्षा जास्त भारतीय WhatsApp अकॉउंट्सवर बंदी घातली आहे. अशी माहिती कंपनीच्या मासिक अहवालातून समोर आली आहे. नियमांचा भंग केल्यामुळे WhatsApp अकॉउंट्स बंद करण्यात आले आहेत.

WhatsApp युजर्सच्या सुरक्षेसाठी अकॉउंट्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर सेफ्टी रिपोर्टनुसार, एकूण 22,09,000 अकॉउंट बंद करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील कंपनीच्या नियमांचे पालन केले नाही, तर तुमचे अकॉउंट देखील या यादीत सामील होऊ शकते.