तुमचं Whatsapp अकाउंट दुसरं कोणी वापरत नाही का? अशाप्रकारे करू शकता चेक...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 03:09 PM2021-11-01T15:09:54+5:302021-11-01T15:15:06+5:30

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी अनेक चांगले फीचर्स आणत असते.

आजच्या डिजिटल युगात गोपनीयतेचा मुद्दा खूप मोठा प्रश्न म्हणून समोर आला आहे. गेल्या काही वर्षांत केंब्रिज अॅनालिटिकासारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे आपल्या गोपनीयतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजच्या ऑनलाइन युगात आपला आवश्यक डेटा आपल्या फोनपुरता मर्यादित आहे का? की त्याचा कुठेतरी गैरवापर होतोय? अशा परिस्थितीत आमच्या गोपनीयतेशी खेळून आमच्या संमती आणि असहमतीशी संबंधित प्रश्नांना प्रभावित केले जात आहे.

आज जगभरात 2 अब्जाहून अधिक युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी अनेक चांगले फीचर्स आणत असते. दुसरीकडे, हॅकर्स या अॅपमध्ये असलेल्या बगद्वारे तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात.

दरम्यान, तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दुसरे कोणी वापरत आहे की नाही, हे तुम्ही कसे शोधू शकता? हे आम्ही तुम्हाला अशा पद्धतींबद्दल माहिती देत आहेत की, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप खाते कोण वापरत आहे? हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Whatsapp Activity चेक कराव्या लागतील.

जर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये इतर कोणाचा अ‍ॅक्सेस असल्यास, तुम्ही मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील कॉल हिस्ट्री द्वारे देखील शोधू शकता. जर तुमच्या व्हॉट्सअॅपवर तुम्ही पाठवलेला नाही, असा मेसेज येत असल्यास, तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याची शक्यता जास्त आहे.

तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहून देखील शोधू शकता. अकाउंट हॅक केल्यानंतर अनेकदा हॅकर्स कॉन्टॅक्ट डिटेल्स बदलतात. तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये काही बदल दिसल्यास, याचा अर्थ तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट खाते हॅक झाले आहे. याशिवाय, तुम्ही मेन्यू बारमधील लिंक्ड डिव्हाईसच्या पर्यायावर क्लिक करून देखील शोधू शकता.

जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅकर्सपासून सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्ही आधी तुमच्या अकाउंटमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा (Two-Factor Authentication) ऑप्शन ऑन करणे आवश्यक आहे. असे केल्याने कोणीतरी नवीन डिव्हाइसवर लॉग इन केल्यास, त्यावेळी एक पिन प्रविष्ट करण्यास मागितले जाईल.

Read in English