WhatsApp वर आता 32 जणांना करा कॉल! काय आहे नवं फिचर, कसं वापरायचं? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:27 PM2022-04-16T13:27:20+5:302022-04-16T13:31:09+5:30

व्हॉटस्ॲप सातत्याने य़ुजर्सच्या गरजा पाहून नवनवे फीचर्स लाँच करीत असते. असलेल्या सुविधा अधिक अपग्रेड करीत असते. आता वेगवेगळ्या ग्रुपमधील व्यक्तींना एकमेकांशी चॅट करता येणार आहे.

व्हॉटस्ॲप सातत्याने य़ुजर्सच्या गरजा पाहून नवनवे फीचर्स लाँच करीत असते. असलेल्या सुविधा अधिक अपग्रेड करीत असते. आता वेगवेगळ्या ग्रुपमधील व्यक्तींना एकमेकांशी चॅट करता येणार आहे. यासाठी कम्युनिटी फिचरमध्ये बदल केले जाणार असल्याची माहिती व्हॉटस्ॲपनेच ब्लॉगमध्ये दिली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये व्हॉटस्ॲप हे फिचर सुरू करण्याची शक्यता आहे.

कशावरही तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी युजरला टेक्स्ट टाईप करावी लागते. हे टाळून अधिक सोप्या पद्धतीने आणि तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी इमोजी रिॲक्शनचे फिचर देण्यात येणार आहे.

या फिचरमध्ये कुणी चुकीची, आक्षेपार्ह किंवा तणाव निर्माण करू शकणारी पोस्ट टाकल्यास ती डिलीट करण्याचे अधिकार ॲडमिनला असतील.

एकमेकांना अपडेट करणे तसेच माहिती पोहचवण्यासाठी दोन जीबी इतक्या साईजची फाईल यात युजर्सना अपेक्षित अससेल्या व्यक्तीला शेअर करता येईल.

एखाद्या विषयावर चर्चेसाठी अनेक वेगवेगळ्या ग्रुप्सना एकत्र आणता येईल. चर्चेमध्ये कुणाला घेणे न घेणे, कोणत्या ग्रुपला समाविष्ट करणे, याचे अधिकार ॲडमिनला दिले जातील.

काही ग्रुपपुरत्या असलेल्या चर्चा तसेच चॅटिंगला अधिक विस्तारता येईल.

अनेकदा अशी स्थिती असते की केवळ चॅटिंग पुरेसे नसते तर थेट बोलण्याची गरज असते. यासाठी व्हॉट्सॲप एकाच वेळी ३२ युजर्सना कॉल करता येईल, अशी सोय देणार आहे.

केवळ एका टॅपवर असा फोन करणे शक्य होणार आहे. सध्या ८ जणांमध्ये ग्रुप कॉल करता येतो. ग्रुप कॉलिंगची सुरुवात ४ जणांपासून झाली होती.