whatsapp to stop ios users from taking screenshots of profile photo
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार! By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:52 PM2024-05-13T23:52:13+5:302024-05-13T23:57:40+5:30Join usJoin usNext WhatsApp : युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अपडेट आणले जात आहे. व्हॉट्सॲपने (WhatsApp) लवकरच एक फीचर्स हटवणार असल्याची माहिती, या वर्षी मार्चमध्ये देण्यात आली होती. यानंतर कोणताही व्हॉट्सॲप युजर्स इतर युजर्सच्या व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अपडेट आणले जात आहे. या फीचरचे नाव स्क्रीनशॉट ब्लॉकिंग – प्रोफाइल फोटो (Screenshot blocking – profile photo) आहे. इन्स्टंट मेसेजिंग ॲपच्या आगामी फीचरचा मागोवा घेणारी वेबसाइट WA Beta Info ने सांगितले की, व्हॉट्सॲप एक नवीन अपडेट आणत आहे, ज्यानंतर iOS युजर्स इतर युजर्सच्या प्रोफाइल फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. Android च्या व्हॉट्सॲप बीटा व्हर्जनमध्ये युजर्स सध्या दुसऱ्याच्या प्रोफाइल फोटोचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत. दरम्यान, iOS प्लॅटफॉर्मवर हे फिचर अद्याप आले नसले तरी लवकरच त्याची चाचणी सुरू होणार आहे. WA Beta Info ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. स्क्रीनशॉटच्या शीर्षस्थानी 'स्क्रीन कॅप्चर ब्लॉक्ड' असे लिहिले दिसेल. यानंतर खाली लिहिले की प्रत्येकाच्या गोपनीयतेची काळजी घेण्यात आली आहे. हे स्क्रीन कॅप्चर ब्लॉक करण्यात आले आहे. WA Beta Info ने लिहिले, आमचे मत आहे की, कंपनी युजर्सना आपल्या वैयक्तिक माहितीवर चांगले नियंत्रण देऊ इच्छिते. यासोबत प्रोफाईल फोटोचा गैरवापरही रोखायचा आहे. जरी या फीचर्सच्या मदतीने धोका पूर्णपणे काढून टाकला जाऊ शकत नाही, परंतु गोपनीयतेच्या नियंत्रणासाठी हे एक चांगले पाऊल आहे. व्हॉट्सॲपवर येणारे Screenshot Blocking – Profile Photo फीचर्स अद्याप डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. सर्व टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, ते स्टेबल व्हर्जनसाठी लाँच केले जाईल. मात्र स्टेबल व्हर्जनमध्ये ते कधी लाँच केले जाईल. याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.टॅग्स :व्हॉट्सअॅपतंत्रज्ञानWhatsApptechnology