Whatsapp trick how to use Whatsapp without phone number check process
आता प्रायव्हसीची चिंता सोडा, फोन नंबर न वापरता असं चालवा WhatsApp By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 3, 2021 12:49 PM2021-02-03T12:49:53+5:302021-02-03T13:07:52+5:30Join usJoin usNext नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर अनेक व्हॉट्सअॅप (WhatsApp) युझर्स व्हॉट्सअॅप सोडताना दिसत आहेत. व्हॉट्सअॅपवरील आपल्या प्रायव्हेट डेटाच्या शेअरिंगसंदर्भात लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आम्ही आपल्याला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, जिच्या सहाय्याने आपण आपला पर्सनल नंबर शेअर न करता व्हॉट्सअॅपचा वापर करू शकाल. यासाठी आपल्याला एका व्हर्च्युअल नंबरची आवश्कता असेल. वर्च्युअल फोन नंबरसाठी TextNow अॅप्लीकेशन हा एक चांगला पर्याय आहे. TextNow वरून नंबर मिळवण्यासाठी आपल्याला हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. व्हर्च्युअल नंबरसाठी आपल्याला सर्वप्रथम TextNow वर एक फ्री अकाउंट तयार करावे लागेल. यावर लॉग-इन केल्यानंतर आपल्याला US आणि कॅनडा तील 5 फ्री फोन नंबरची एक यादी मिळेल. या फ्री नंबरपैकी आपल्याला कुठलाही एक नंबर निवडायचा आहे. या व्हर्च्युअल नंबरच्या सहाय्याने आपण कॉलही करू शकता तसेच इंटरनेटवर मेसेजदेखील पाठवू अथवा मिळवू शकता. पर्सनल नंबर न वापरता चालवा WhatsApp - आता WhatsApp आपल्या फोनमध्ये डाउनलोड करा. जर आधीपासूनच आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाउनलोड असेल, तर ते आपल्याला सर्वप्रथम अनइंस्टॉल करावे लागेल. व्हॉट्सअॅपवर रजिस्ट्रेशन करताना, आपण निवडलेल्या व्हर्च्युअल नंबरच्या आधारे, भारताचा STD कोड बदलून US अथवा कॅनडाचा STD कोड टाका. त्यानंतर आपला व्हर्च्युअल नंबर टाका. यावेळी TextNow अॅप बॅकग्राउंडला ओपन ठेवा. महत्वाचे म्हणजे, या व्हर्च्युअल फोन नंबरवर आपल्याला OTP मिळणार नाही. OTP चा टायमिंग एक्सपायर होण्याची वाट बघा. यानंतर OTP साठी ‘Call me’ ऑप्शन सेलेक्ट करा. आपल्याला TextNow अॅपवर मिस्ड कॉल मिळेल आणि TextNow अॅपमध्ये आपल्या व्हाईसमेलवर एक नवा मेसेज येईल. हा एक ऑडिओ मॅसेज असेल. यात आपल्याला आपला कोड सांगितला जाईल. यानंतर ओटीपी कोड टाकून पुढील प्रोसेस करा आणि आपला पर्सनल नंबर न वापरता व्हॉट्सअॅप चालवा. व्हॉट्सअॅपटॅग्स :व्हॉट्सअॅपमोबाइलसोशल मीडियाWhatsAppMobileSocial Media