अरे व्वा! Android युजर्ससाठी WhatsApp आणतंय खास नवं फीचर; चॅटींग करणं होणार आणखी सोपं By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 02:49 PM 2022-02-16T14:49:58+5:30 2022-02-16T14:57:51+5:30
WhatsApp News : WhatsApp ही आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर करण्यासाठी नवनवीन फीचर्स हे सातत्याने आणत असतं. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. WhatsApp ही आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर करण्यासाठी नवनवीन फीचर्स हे सातत्याने आणत असतं.
काही दिवसांपूर्वी WhatsApp ने कॉन्टॅक्ट सेक्शनच्या इंटरफेसला बदलले आहे. सध्या हे फीचर अँड्राइड बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरला Frequently contacted आणि Recent chats अशा दोन भागात विभागले आहे.
नावावरूनच लक्षात येते की, वारंवार ज्या युजर्सशी चॅट करता, ते युजर्स Frequently contacted मध्ये दिसतात. तर नुकतेच ज्या युजर्सशी चॅट केले आहे ते Recent chats मध्ये दिसतात. परंतु. युजर्सला नवीन बदल आवडलेले नाहीत. कंपनी पुन्हा जुनी कॉन्टॅक्ट लिस्ट आणण्याची शक्यता आहे.
WhatsApp ने गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून अँड्राईड यूजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआउट करण्यास सुरू केले आहे. हे अपडेट अॅप व्हर्जन 2.22.5.9 पर्यंत दिले आहे. रिपोर्टनुसार, युजर्सच्या बॅकलॅशनंतर WhatsApp आता जुन्या इंटरफेसला रिस्टोर करत आहे.
कंपनी जुन्या कॉन्टॅक्ट लिस्ट इंटरफेसला पुन्हा रोलआउट करत आहे. मात्र, सर्वांसाठी अपडेट उपलब्ध होण्यासाठी वेळ लागेल. WhatsApp ने अँड्राईड प्लॅटफॉर्मवर बीटा युजर्ससाठी ग्रुप वॉइस कॉल दरम्यान दिसणाऱ्या अॅप विंडोचे डिझाइन देखील बदलण्यास सुरुवात केली आहे.
आयओएस आणि अँड्राईड युजर्सला बीटा अपडेटमध्ये डिझाइनमध्ये झालेला बदल आधीच पाहायला मिळत आहे. याशिवाय कंपनी ग्रुप कॉल दरम्यान सर्व युजर्ससाठी वॉइस वेवफॉर्म देखील उपलब्ध करत आहे. वॉइस वेवफॉर्म हे वॉइस नोट्समध्ये ज्याप्रमाणे दिसतात, तसे असतील.
एका रिपोर्टनुसार, डिझाइनमध्ये करण्यात आलेले बदल हे खूपच कमी असतील. परंतु, हे बदल पेजला एक नवीन लूक देतात. तसेच, सध्या नवीन डिझाइन केवळ काही अँड्राईड बीटा टेस्टरसाठीच उपलब्ध आहे.
पुढील काही आठवड्यांपर्यंत हे बदल जास्तीत जास्त यूजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या हे बदल केवळ बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व युजर्ससाठी हे कधीपर्यंत रोलआउट केले जातील, हे सांगता येणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.