खूशखबर! स्मार्टफोनमध्ये इंटरनेटशिवाय WhatsApp वापरू शकणार, जाणून घ्या नवीन फीचरबद्दल... By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:39 PM 2021-05-11T13:39:31+5:30 2021-05-11T13:47:48+5:30
WhatsApp : व्हॉट्सअॅप या फिचरची सध्या टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप आता एक असे फीचर आणणार आहे, ज्याची युजर्स बर्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. सध्या युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर वेब व्हर्जन तसेच फोनवर करतात.
जर युजर्सला व्हॉट्सअॅप वेब व्हर्जन वापरायचे असेल तर युजर्सला फोनवर इंटरनेट नेहमीच चालू ठेवावे लागते. मात्र, हे नवीन फीचर आल्यानंतर युजर फोन इंटरनेटशिवाय चालू करून वेब व्हर्जनचा वापरण्यास सक्षम असतील.
HackRead मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनमध्ये युजर्सला आता क्यूआर (QR) कोड स्कॅन करण्याची गरज भासणार नाही. कंपनी व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनसाठी अॅक्टिव्ह मोबाइल कनेक्शनची अनिवार्यता संपुष्टात आणत आहे.
मात्र, ज्या डेस्कटॉपवर युजर्स व्हॉट्सअॅप चालवित आहे, त्यावर इंटरनेट असणे अनिवार्य आहे. व्हॉट्सअॅप सध्या या फीचरची टेस्ट करीत आहे, ज्याचे युजर्स लवकरच वापर करण्यास सक्षम असतील.
रिपोर्टनुसार, ज्या लोकांनी या फीचरच्या टेस्टिंगमध्ये भाग घेतला आहे, त्यांना आता एक मेसेज दिसत आहे. या मेसेजमध्ये ही माहिती देण्यात आली आहे की, तुम्हाला डेस्कटॉप अॅप किंवा वेब व्हर्जनवर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी फोन कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही.
हे फीचर एकाच वेळी जास्तीत जास्त 4 डिव्हाइसवर वापरले जाऊ शकते. तज्ज्ञांचे मत आहे की, व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर मल्टी-डिव्हाइस फीचरचा भाग असू शकते.
मल्टी-डिव्हाइस फीचरमध्ये युजर्स व्हॉट्सअॅपचे एक अकाऊंट एकाच वेळी चार डिव्हाइसमध्ये वापरू शकतील. मल्टी-डिव्हाइस फीचरसाठी मुख्य डिव्हाइससाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही.
व्हॉट्सअॅप या फिचरची सध्या टेस्टिंग करत आहे.