WhatsApp will not get rid of unwanted groups
WhatsApp वर नको असलेल्या ग्रुपपासून होणार सुटका By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 10:22 PM2019-02-16T22:22:48+5:302019-02-16T22:49:26+5:30Join usJoin usNext व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअॅपनं 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर 'Privacy' सेक्शन मध्ये असणार आहे. WhatsApp आयफोन युजर्स Settings > Account > Privacy > Groups मध्ये हे फीचर असणार आहे. त्यानंतर Everyone, My contact, Nobody हे तीन पर्याय मिळतील. तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता. WhatsApp युजर्स कोणत्याही ग्रुपमध्ये सामील होण्याआधी त्याचं इन्विटेशन पाठवणार आहे. त्यानंतर युजर्स ते इन्विटेशन स्विकारायचं की नाही याबाबत विचार करू शकतात. तसेच ग्रुपमध्ये अॅड करण्याआधी तुम्हाला एक नोटीफिकेशन पाठवण्यात येईल. त्या 'ग्रुप इन्विटेशन' चा विचार करण्यासाठी युजर्सकडे 72 तास असणार आहेत.टॅग्स :व्हॉटसअॅपWhatsApp