दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अॅप होणार बंद, तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:30 PM 2022-10-20T12:30:09+5:30 2022-10-20T12:38:37+5:30
सध्याच्या काळात WhatsApp हे महत्वाच अॅप आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आहे. रोजच्या वापरातील हे माध्यम सध्या बनले आहे. पण आता दिवाळीत WhatsAppअनेक यूजर्संला धक्का देण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या काळात WhatsApp हे महत्वाच अॅप आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आहे. रोजच्या वापरातील हे माध्यम सध्या बनले आहे. पण आता दिवाळीत व्हॉट्सअॅप अनेक यूजर्संला धक्का देण्याच्या तयारीत आहे. २४ ऑक्टोबरनंतर व्हॉट्सअॅप अनेक स्मार्टफोनवर काम करणार नाही. जाणून घेऊ कोणत्या मोबाईलवर अॅप बंद होणार आहे.
WhatsApp आता काही जुन्या आयफोनवर बंद होणार आहे.
जर तुमचा आयफोन जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल, तर तुम्ही ते अपडेट करून व्हॉट्सअॅप वापरणे सुरू ठेवू शकता. कंपनी iOS 10 किंवा iOS 11 वर चालणाऱ्या iPhones साठी सपोर्ट बंद करत आहे. त्यामुळे या वापरकर्त्यांसाठी झटका बसणार आहे.
तुम्हाला जर WhatsApp अॅपचा सतत वापर करत असाल तर तुम्हाला नवीन iOS 16 किंवा iOS 15 वर अपडेट करावे लागणार आहे. फक्त iPhone 5C आणि iPhone 5 वापरकर्ते नवीन iOS अपडेट करू शकत नाहीत. त्यामुळे या iPhones वर WhatsApp काम करणार नाही.
तुम्ही अजूनही iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S सारख्या जुन्या iPhone वर WhatsApp वापरू शकता. यासाठी तुम्ही फक्त तुमच्या फोनचे iOS अपडेट तपासू शकता.
इतर वापरकर्त्यांचा आयफोनवर आधीपासूनच नवीन iOS आहे. आयफोन 5सी आणि आयफोन 5 वापरकर्त्यांनाही व्हॉट्सअॅप बंद करण्याची सूचना दिली जात आहे.