Why Samsung launched verticle TV Sero only for Rich people
सॅमसंगने चक्क उभा टीव्ही आणला; पण श्रीमंतांसाठी...वाचा कारण By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:31 PM2019-04-30T14:31:49+5:302019-04-30T14:35:46+5:30Join usJoin usNext सॅमसंगने मनोरंजन क्षेत्रामध्ये एक वेगळा प्रयोग केला आहे. पारंपरिक आडव्या टीव्ही एवजी चक्क उभा टीव्ही लाँच केला आहे. म्हणजे हा टीव्ही मोबाईलसारखा उभा आहे. या टीव्हीचे नाव Sero असे ठेवण्यात आले असून हा टीव्ही सामान्यांसाठी नाही तर कोट्यधीशांसाठी बनविण्यात आला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे या टीव्हीवर मोबाईलसारखेच दृष्य पाहता येणार आहे. सध्याचे करोडपती मोबाईलवर माहिती उभीच पाहतात. यामुळे खास त्यांना समोर ठेवूनच हा टीव्ही बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. महत्वाचे म्हणजे हा टीव्ही आडवाही होऊ शकतो. हा टीव्ही श्रीमंतांना मोबाईलसारखा वाटेल. ते त्यांच्या मोबाईल टीव्हीला जोडू शकणार आहे. तसेच मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओसह सोशल मिडीयादेखील हाताळू शकणार आहेत. या टीव्हीची स्क्रीन 43 इंचाची आहे. जर कोणाला हवे असल्यास हा टीव्ही रोटेटही करता येतो. महत्वाचे म्हणजे हा टीव्ही आडवाही होऊ शकतो. हा टीव्ही श्रीमंतांना मोबाईलसारखा वाटेल. ते त्यांच्या मोबाईल टीव्हीला जोडू शकणार आहे. तसेच मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओसह सोशल मिडीयादेखील हाताळू शकणार आहेत. या टीव्हीची स्क्रीन 43 इंचाची आहे. जर कोणाला हवे असल्यास हा टीव्ही रोटेटही करता येतो. या टीव्हीला 4.1 चॅनेलचे 60 वॉटचे हाय एंड स्पिकर देण्यात आले आहेत. ज्याच्या आधारे सॅमसंग म्युझिकसह मोबाईलवरील गाणी ऐकू शकता. या टीव्हीला सॅमसंगच्या व्हर्च्युअल असिस्टंट Bixby द्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. या टीव्हीची किंमत तब्बल 11.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही पुढील महिन्यापासून दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप दुसऱ्या बाजारांमध्ये कधी हा टीव्ही आणला जाईल य़ाची माहिती दिलेली नाही. सोशल मिडीयावरही सॅमसंगच्या या नव्या प्रयोगाची खिल्ली उडवितानाच प्रश्नही उपस्थित केले आहेत.टॅग्स :सॅमसंगsamsung