World Photography Day 2019: या 5 अ‍ॅप्सच्या माध्यमातून फोटो होतील आणखी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 08:57 PM2019-08-19T20:57:27+5:302019-08-19T21:06:24+5:30

आजकाल फोटो काढण्याची तरुणाईला फारच हौस असते. एखाद्या नयनरम्य ठिकाणी गेल्यावर सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. त्यातच वेगवेगळ्या अ‍ॅप्समुळे फोटो आणखीच खुलून दिसतात.

Prisma- फोटोला वेगळं लूक देण्यासाठी हे अ‍ॅप्स महत्त्वाचं ठरतं. या अ‍ॅप्समध्ये फोटोला पेंटिंग करणं, स्केच करण्यासारखे इफेक्ट देता येतात. प्रिज्मा अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर्स देण्यात आलेले आहेत.

Retrica- रेट्रिका अ‍ॅपमध्ये वापरकर्त्याला अनेक प्रकारेच इफेक्ट मिळणार आहेत. या अ‍ॅपमध्ये फोटोवर क्लिक केल्यानंतर तो एडिट करता येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण फोटोला आणखी सुंदर बनवू शकतो.

Candy Camera- या अ‍ॅपमध्ये फोटोसाठी 100 इफेक्ट आणि फिल्टर देण्यात आलेले आहेत. या फिल्टरमध्ये ब्युटी फंक्शन, स्किन स्मूदनिंगसारखे इफेक्टही दिले आहेत.

Teleport-Photo Editor- या अ‍ॅपच्या माध्यमातून फोटोचं बॅकग्राऊंड बदलता येतं. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापर केला जातो. या अ‍ॅपच्या माध्यमातून बॅकग्राऊंडला ब्लर केला जाऊ शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून फोटोचा कलरही चेंज करता येतो.

YouCam Makeup- या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर उपलब्ध आहेत. ज्यात फोटोला मेकअप करण्यात येते. या अ‍ॅपमध्ये फोटोवर लिपस्टिकही लावता येते. तसेच भुवयाही कलर करता येतात.