worlds fastest electric car miss r is touch 0 to 100 kmph in just 1 8 second know price
तब्बल साडेसहा कोटींची कार!; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 10:44 PM2018-04-23T22:44:05+5:302018-04-23T22:45:35+5:30Join usJoin usNext सध्या जगभरात इलेक्ट्रिक कार्सची चर्चा आहे. इलेक्ट्रिक कार्स पर्यावरणपूरक असल्यानं जगभरातली अनेक सरकारं सध्या या गाड्यांना पसंती देत आहेत. या गाड्या आता अनेक बाबींमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना मागे टाकताहेत. मिस आर या कारनं तर ऑटोमोबाईल जगतात धुमाकूल घातलाय. ही कार अवघ्या 1.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर/प्रति तास इतका वेग पकडते. पोर्श 918 स्पायडर 0 ते 100 किलोमीटर/प्रति तास इतका वेग अडीच सेकंदात पकडते. तर टेस्लाच्या एस मॉडेलला हा वेग पकडण्यासाठी 2.3 सेकंद इतका वेळ लागतो. मात्र या दोन्ही गाड्यांना मिस आर मागे टाकते. मिस आर गाडीच्या चारही चाकांमध्ये 350 वोल्टची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. मिस आरमध्ये 1 मेगावॅट म्हणजेच 1,314 हॉर्स पॉवरचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. बॅटरी पॅक थंड ठेवण्यासाठी इमर्सिव कूलिंग फिचरदेखील देण्यात आलंय. या बॅटरी पॅकचं डिझाईन अतिशय चांगलं असून बॅटरी पॅक सहजपणे काढतादेखील येतो. मिस आर गाडीची किंमत तब्बल साडे सहा कोटी रुपये आहे. टॅग्स :कारcar