xiaomi oneplus google smartphone emitting the most radiation
'या' स्मार्टफोन्सचे रेडिएशन सर्वाधिक धोकादायक By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:31 PM2019-02-18T15:31:25+5:302019-02-18T16:16:11+5:30Join usJoin usNext स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन हे धोकादायक असते. फेडरल ऑफिस ऑफ रेडिएशन प्रोटेक्शनने केलेल्या अभ्यासात सर्वात जास्त आणि सर्वात कमी रेडिएशन निघणाऱ्या स्मार्टफोनबाबत माहिती देण्यात आली आहे. Online Statistics and marketing firm,Statista च्या लिस्टमध्ये 16 स्मार्टफोनची नावं देण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात जास्त रेडिएशन निघणाऱ्या स्मार्टफोनबाबत सांगण्यात आले आहे. भारतात OnePlus, Xiaomi या कंपन्यांनी मोबाईल विक्रीमध्ये उच्चांक गाठला आहे. मात्र, याच कंपन्यांचे फोन तुमच्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत. या कंपन्यांच्या स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन सर्वांत जास्त आणि पातळी ओलांडणारे आहे. रेडिएशनला स्पेसिफिक अॅब्सॉर्पशन रेट (SAR) असे म्हटले जाते. हे प्रमाण किलोग्रॅम वॅटमध्ये मोजले जाते. भारतात या सीएसआरची मर्यादा 1.60 वॅट एवढी ठेवण्यात आली आहे. एमआय ए1 ची सीएसआर व्हॅल्यू 1.75 वॅट तर वनप्लस 5टी ची व्हॅल्यू 1.68 वॅट प्रती किलो आढळून आली आहे. स्मार्टफोनच्या या यादीमध्ये पहिला एमआय ए1, दुसरा वनप्लस 5टी, तिसरा एमआय मॅक्स 3 आणि चौथा पुन्हा वनप्लसचा नुकताच लाँच झालेला 6टी हा फोन आहे. तर नवव्या क्रमांकावर अॅपलचा आयफोन 7 हा आहे ज्याची एसएआर व्हॅल्यू 1.38 आहे. HTC, Google, Apple, Sony आणि ZTE चे स्मार्टफोनचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. कमी रेडिएशन सोडणाऱ्या 16 फोनच्या यादीमध्ये सॅमसंगचे तब्बल 8 फोन आहेत. ज्यांची एसएआर व्हॅल्यू 0.17 वॅट प्रतिकिलोपासून आहे. Google Pixel 3 XL, Pixel 3 आणि Apple iPhone 8 चा या यादीत समावेश असून पहिल्या क्रमांकावर सॅमसंगचा नोट 8 हा फोन आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर झेडटीईचा एक्सॉन इलाईट, तिसऱ्या क्रमांकावर एलजी जी 7, चौथ्या क्रमांकावर सॅमसंगचा गॅलेक्सी ए 8 आणि पाचव्या क्रमांकावर सॅमसंगचा एस 8 हा फोन आहे. मोबाईलमधून निघणारे रेडिएशन मोजण्याच्या पद्धतीला स्पेसिफिक अॅब्सॉर्पशन रेट (SAR) असे म्हटले जाते. भारतात हे प्रमाण 1.6 वॅट प्रती किलो एवढे आहे. तर परदेशात 2.0 वॅट प्रती किलो एवढे पकडले जाते. या एसएआर व्हॅल्यूमुळे निसर्गासह मानवावरही मोठा परिणाम होतो.टॅग्स :मोबाइलशाओमीसॅमसंगगुगलMobilexiaomisamsunggoogle