Xiaomi Redmi Note 6 Pro लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खासियत! By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:02 AM 2018-11-19T11:02:47+5:30 2018-11-19T16:09:51+5:30
शाओमी रेडमी नोट 6 Pro भारतात 22 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. फिल्पकार्ट आणि मी डॉट कॉमवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
ब्लॅक फ्रायडेच्या निमित्ताने सेलचं आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये शाओमीच्या या स्मार्टफोनची विक्री करण्यात येणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी 12 वाजता शाओमी रेडमी नोट 6 Pro चा पहिला सेल असणार आहे.
शाओमी रेडमी नोट 6 ची किंमत साधारण 15 ते 20 हजारादरम्यान असू शकते. मात्र कंपनीने भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असणार आहे याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
शाओमी रेडमी नोट 6 Pro हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरोज असलेल्या फोनची किंमत थायलंडमध्ये 6,990 THB आहे.
शाओमी रेडमी नोट 6 Pro हा स्मार्टफोन मीयूआई 10 वर काम करत असून अॅन्ड्रॉईड ओरियो 8.1 वर आधारित आहे. तसेच 6.26 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
स्मार्टफोममध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 636 प्रोसेसर देण्यात आला असून 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
शाओमी रेडमी नोट 6 Pro मध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप असणार आहे.