अंडर डिस्प्ले कॅमेरा, क्वाड कर्व्ह्ड वॉटरफॉल स्क्रिन; पाहा Xiaomi चा जबरदस्त स्मार्टफोन By जयदीप दाभोळकर | Published: February 8, 2021 07:27 PM 2021-02-08T19:27:26+5:30 2021-02-08T19:37:33+5:30
Xiaomi : कंपनीनं दाखवली नव्या कॉन्सेप्ट फोनची झलक Xiaomi ही कंपनी सातत्यानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. नव्या तंत्रज्ञानाचाही वापर कंपनी आपल्या अनेक प्रोडक्टमध्ये करत असते. (सर्व फोटो - शाओमी)
Xiaomi नं आता एक नवा कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनद्वारे Xiaomi नं कर्व्ह्ड डिस्प्ले डिझाईन एका वेगळ्याच लेव्हलवर नेण्याचा प्रयत्न केलाय.
केवळ बाजूलाच नाही तर वरील आणि खालील बाजूलाही या स्मार्टफोमनध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आलाय. याचमुळे हा फोन चारही बाजूंनी वॉटरफॉलप्रमाणे दिसून येतो.
हा रिव्होल्यूशनरी हायपर क्वाड कर्व्ह्ड ८८ डिस्प्ले तयार करणं इतकं सोपं नव्हतं, असं कंपनीनं म्हटलं.
याला ८०० डिग्री सेल्सिअस तापमानावप हॉट बेंडिंग ग्लासचा वापर करून हा आकार देण्यात आला आहे.
साईडला चारही बाजूंना डिस्प्ले असण्याचा अर्थ असा की हा एक पोर्ट फ्री स्मार्टफोन आहे. तसंच यात वायरलेस चार्जिंगही दिलं गेलं असण्याची शक्यता आहे.
तसंच यासोबत कंपनीनं नुकतंच लाँच केलेल्या Mi Air Charge Technology चादेखील सपोर्ट मिळतो. या तंत्रज्ञानाद्वारे हा स्मार्टफोन ठराविक अंतरावरूनही चार्ज केला जाऊ शकतो.
याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे स्क्रिनवर नॉच दिसून येत नाही.
कंपनीनं हा फोन सध्या कमर्शिअली लाँच केलेला नाही. या फोनमध्ये ई-सिम, प्रेशर सेन्सिटिव्ह टच सेन्सर आणि बिल्ट इन स्पीकर्स देण्यात आले आहेत.
पूर्णप्रकारे हा एक पोर्टलेस डिस्प्ले आहे. मागील बाजूला शाओमीनं आपलं ब्रँडिंगदेखील केलं आहे.