Xiaomi Unveils Mi Air Charge Wireless Charging Technology to Fuel Up Devices Over the Air
Mi Air Charge : सायन्स फिक्शन नाही; ना वायर, ना स्टँड, कुठेही बसून मोबाईल करता येणार चार्ज By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 04:40 PM2021-01-29T16:40:29+5:302021-01-29T16:47:08+5:30Join usJoin usNext आपण एखादा मोबाईल किंवा दुसरं कोणतंही गॅजेट असेल ते चार्ज करण्यासाठी चार्जर वापरतो. जास्तीतजास्त काय तर वायरलेस चार्जरही वापरतो. पण वायरलेस चार्जर वापरताना आपल्या मोबाईल किंवा गॅजेट त्या चार्जरवर ठेवावं लागंत. जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा फोन किंवा गॅजेट वापरताना किंवा काम करताना हवेतून चार्ज झाला तर. विश्वास बसणार नाही ना? पण हे अगदी खरंय. (सर्व फोटो - शाओमी) Xiomi नं शुक्रवारी एक नवी टेक्नॉलॉजी सादर केली आहे. याला कंपनीनं Mi Air Charge असं नाव दिलं आहे. ही टेक्नॉलॉजी सध्याच्या वायरलेस टेक्नॉलॉजीपेक्षा अतिशय वेगळी आहे. Mi Air Charge टेक्नॉलॉजीद्वारे युझर्स कितीही लांब बसून आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस चार्ज करु शकतील. विना वायर, गेम खेळताना, कोणतंही काम करताना याद्वारे तुम्ही अनेक डिव्हाईस सोबत चार्ज करू शकता, असं कंपनीनं म्हटलं आहे. शओमीनं एका ब्लॉग पोस्ट द्वारे याबाबत माहिती दिली आहे. या नव्या टेक्नॉलॉजीद्वारे कोणतंही डिव्हाईस लांबूनच चार्ज केलं जाऊ शकतं असं कंपनीनं म्हटलं आहे. यामध्ये ना कोणती वायर, ना चार्जिंग स्टँड ना आणखी कोणत्या वस्तूची गर असेल. हे ट्रू वायरलेस डिव्हाईस असेल असं कंपनीनं म्हटलं आहे. Mi Air Charge च्या टेक्नॉलॉजीबाबत कंपनीनं सांगताना ही चार्जिंग मेथड स्पेस पोझिशनिंग आणि एनर्जी ट्रान्समिशन बेस्ड आहे. शाओमीनं स्वत: डेव्हलप केलेल्या आयसोलेटेड चार्जिंग पाइलमध्ये इनबिल्ट ५ फेज इंटरफिअरन्स अँटिना आहेत. यामुळे स्मार्टफोनचं ठिकाण योग्य प्रकारे माहिती करून घेतलं जाऊ शकतं. तसंच यात १४४ अँटिनांनी तयार करण्यात आलेल्या एक फेज कंट्रोल एरे मिलीमीटर-वाईड वेव्ह्सला बीमफॉर्मिगद्वारे थेट फोनमध्ये ट्रान्समिट करण्याचं काम करतो. तर स्मार्टफोनसाईडबाबत सांगायचं झालं झालं तर शाओमीनं बिल्ट इन बिकॉन अँटिना एरे सोबत छोटा अँटिनाही डेव्हलप केला आहे. बीकन अँटिना लो पॉवर कन्झम्पशनसह पोझिशन इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट करतं. याप्रकारे १४ अँटिनांनी तयार केलेला रिसिव्हिंग अँटिना एरे चार्जिग पाईलद्वारे एमिट केल्या जाणाऱ्या मिलीमीटर व्हेव सिग्नलला रेक्टिफाय करून सर्किटद्वारे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतो. सायन्स फिक्शनप्रमाणे वाटणारं हे डिव्हाईस चार्जरप्रमाणे काम करतं. सध्या हे डिव्हाईस सिंगल डिव्हाईसला ७ मीटरच्या परीघात 5W रिमोट चार्जिंग देऊ शकतं. याव्यतिरिक्त अन्य कोणतीही डिव्हाईस चार्ज करता येऊ शकतात. प्रत्येक डिव्हाईसला 5W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो. पुढील काळात या टेक्नॉलॉजीद्वारे स्मार्टवॉच किंवा अन्य वेअरेबल डिव्हाईसेसदेखील चार्ज करता येतील. लवकर कंपनी स्पीकर्स, डेस्क लँपसारख्या वस्तू देखील वायरलेस पॉवर सप्लाय डिढाईन बेस्ड असतील. याप्रकारे आपण आपलं लिव्हिंग रूम ट्रूली वायरलेस ठेवू शकतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे. टॅग्स :शाओमीतंत्रज्ञानमोबाइलस्मार्टफोनxiaomitechnologyMobileSmartphone