Is your mobile duplicate or not? Recognize that
तुमचा मोबाईल बनावट तर नाही ना? असे ओळखा By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:41 PM2019-04-17T13:41:23+5:302019-04-17T13:56:53+5:30Join usJoin usNext सध्या चोरीचे मोबाईल आयएमईआय नंबर बदलून विकले जात आहेत. तसेच बनावट मोबईलही कमी किंमतीचे आमिष दाखवून विकले जात आहेत. यामुळे नंतर आपण फसलो गेल्याची भावना तयार होते. तुमच्याकडेही मोबाईल असतोच, पण तो बनावट किंवा चोरीचा तर नाही ना. बरेचजण ऑनलाईन स्मार्टफोन घेण्यास कचरतात. त्यांनाही बनावट फोन मिळण्याची भीती सतावत असते. एका पद्धतीने आपण हा मोबाईल बनावट आहे की खराखुरा हे तपासू शकणार आहोत. ही सेवा सरकारी खाते डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (डॉट) ने दिलेली आहे. या सेवेंतर्गत तुम्हाला एक मॅसेज पाठवावा लागणार आहे. याद्वारे तुम्ही मोबाईलची माहीती मिळवू शकता किंवा C-DOT च्या अॅपद्वारेही तपासू शकता. मोबाईलचा आयएमईआय नंबर माहिती असेल तर हा 15 अंकी क्रमांक KYM स्पेस देऊन लिहावा. यानंतर हा मेसेज 14422 या क्रमांकावर पाठवावा. आयएमईआयचा क्रमांक माहीती नसेल तर *#06# डायल केल्यावर मिळतो. ड्युअल सिम असल्यास दोन क्रमांक येतात. हा मॅसेज पाठविल्यानंतर तुम्हाला मोबाईलची कंपनीसहित माहीती येते. C-DOT अॅपद्वारेही माहीती पाहू शकता. KYM - Know Your Mobile हे अॅप प्ले-स्टोअरवर रजिस्टर आहे. हे अॅपही तुमचा मोबाईलचा आयएमईआय नंबर ब्लॉक आहे किंवा नाही हे सांगू शकणार आहे.टॅग्स :मोबाइलगुन्हेगारीMobileCrime News