YouTube द्वारे कमाई करणाऱ्यांना मोठा झटका; आता भरावा लागणार 'इतका' टॅक्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:10 PM 2021-03-10T15:10:09+5:30 2021-03-10T15:26:44+5:30
YouTube : YouTube ने सर्व YouTubers ना याबाबत अधिकृत मेल पाठविला आहे. सध्या YouTube हे कमाईचं मोठं स्रोत बनलं आहे. अनेक युजर्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ तयार करतात आणि लाखो रुपये कमवतात. पण आता एका नवी घोषणा करण्यात आली आहे. गुगलने मेल पाठवून इंडियन यू ट्यूबला एक इशारा दिला आहे.
गुगलने हे स्पष्ट केले आहे की यंदा 31 मे नंतर ते YouTubers च्या प्रत्येक कमाईवर टॅक्स आकारला जाईल. म्हणजेच जर आपण आपल्या YouTube चॅनेलवरुन महिन्याला 1 लाख रुपये कमविले आणि वर देण्यात आलेल्या तारखेपूर्वी आपले टॅक्स डॉक्यूमेंट सबमिट केला नाही तर YouTube आपल्या महिन्याच्या एकूण कमाईमधून 24,000 रुपये वजा करेल.
YouTube ने सर्व YouTubers ना याबाबत अधिकृत मेल पाठविला आहे. अमेरिकन YouTubers वर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकेबाहेरील कंटेंट क्रिएटर्ससाठी हे लागू होणार आहे.
Gadgets Now च्या वृत्तानुसार, गुगलने आपल्या अधिकृत कम्यूनिकेशनमध्ये आम्ही Adsense टॅक्स भरण्याविषयी माहिती विचारू, 31 मे 2021 पर्यंत तुमच्या टॅक्सबाबतची माहिती उपलब्ध नसल्यास, Google तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईमधून 24 टक्के पैसे वजा करेल असं म्हटलं आहे.
युजर्सना एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की, या पैशांमध्ये तुम्ही जाहिरात आणि अमेरिकन युजर्सद्वारे मिळवलेल्या पैशांचा देखील समावेश असेल. तसेच या यादीमध्ये यूट्युब प्रीमियम, सुपर चॅट, सुपर स्टिकर्स आणि चॅनेल मेंबरशिप्सचादेखील समावेश असेल.
कंपनीने जर तुम्ही टॅक्स डॉक्यूमेंटची संपूर्ण माहिती दिली तर तुम्हाला अमेरिकेबाहेरील व्यअर्ससाठी टॅक्स भरावा लागणार नाही किंवा त्या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही असं म्हटलं आहे.
YouTube च्या या मेलकडे तुम्ही लक्ष दिले नाही आणि तुमची टॅक्स इन्फो सबमिट केली नाही तर तुम्हाला तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या 24 टक्के रक्कम द्यावी लागेल. जर तुम्ही टॅक्स इन्फो जमा केली केली आणि ट्रिटी बेनिफिट पात्र असाल तर तुम्हाला त्या अमेरिकन दर्शकांसाठी 15 टक्के कर भरावा लागेल.
ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमावले आहेत. दुसरीकडे, जर तुम्ही टॅक्स भरला आणि टॅक्स ट्रिटीसाठी पात्र नसाल तर तुम्हाला 30 टक्के कर भरावा लागेल. हा कर अमेरिकन व्यअर्सद्वारे मिळणाऱ्या कमाईवर भरावा लागेल.
गुगलने एक उदाहरण देत म्हटले आहे की जर भारतातील एखादा कंटेट क्रिएटर महिन्यात 1000 डॉलर कमावतो आणि त्याने त्यापैकी 100 डॉलर्स अमेरिकन दर्शकांच्या मदतीने कमावले आहेत, तर मग त्याला त्याच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या 24 टक्के रक्कम टॅक्स स्वरुपात द्यावी लागेल.
क्रिएटरला 1000 डॉलर्सचे 24 टक्के म्हणजेच 240 डॉलर्स द्यावे लागतील. या नव्या कर प्रणालीमुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण भारतातील यूट्युबर्सना आधीपासूनच अमेरिकेतील यूट्युबर्सपेक्षा कमी पैसे मिळतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात असतं. याच दरम्यान युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कंपनीने आता एका खास फीचरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या फीचरमुळे पालक या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत.
कंपनीने आपल्या एका ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केलं जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या (Supervised Google Account) माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाऊंटपर्यंत पालकांचा अॅक्सेस असेल. त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक रेस्ट्रिक्शन लावू शकतील.
1. Explore (एक्सप्लोर) नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स जारी करेल. ही सेटिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.
2. Explore more (एक्सप्लोर मोअर) ही सेटिंग 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अॅक्सेस करता येईल.
3. Most of YouTube (मोस्ट ऑफ यूट्यूब) या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. मुलं केवळ Age Restrictions वाले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना देईल.