YouTube to Host Free Streaming Film Festival With Cannes, Sundance & More rkp
Youtubeच्या युजर्ससाठी शानदार 'गिफ्ट', आता मोफत चित्रपट पाहता येणार... By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:33 PM2020-04-29T16:33:06+5:302020-04-29T22:16:42+5:30Join usJoin usNext नवी दिल्ली : Youtube ने ट्रिबेका इंटरप्रायजेससोबत मिळून ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. या फेस्टिव्हलमध्ये 10 दिवस जगभरातील नवीन चित्रपट दाखविले जाणार आहेत. लॉकडाऊनदरम्यान सुरु होणारा हा फेस्टिव्हल Youtubeच्या युजर्सना नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे, या फेस्टिव्हलच्या माध्यमातून नवीन आणि क्लासिक चित्रपट दाखविले जाणार आहेत. तसेच, यासाठी Youtube च्या युजर्सला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. Googleचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून 'We are one' अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलची माहिती दिली आहे. सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे की, हा फेस्टिव्हल 10 दिवस असणार आहे. फेस्टिव्हलची सुरुवात 29 मे रोजी होणार आहे, तर 7 जूनला संपणार आहे. यादरम्यान युजर्स चित्रपट पाहू शकणार आहेत. तसेच, या फेस्टिव्हलमध्ये फक्त एकाच देशातील चित्रपट नाहीत, तर संपूर्ण जगभरातील चित्रपटांचा समावेश आहे. 10 दिवस Youtube या फेस्टिव्हलचे आयोजन करणार आहे. ट्रिबेका इंटरप्राइजेस आणि यूट्यूबच्या या 'We are one' अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल कार्यक्रमात बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, सनडांस फिल्म फेस्टिव्हल, सिडनी फोटो फेस्टिव्हल, टोक्यो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ट्रिबेका फेस्टिव्हल आणि कान्स फिल्म फेस्टिव्हल यांचा समावेश आहे. 10 दिवसांपर्यंत सर्व आयोजित कार्यक्रमानुसार हा फेस्टिव्हल असणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलचा उद्देश कोरोनावर (COVID-19) मात करण्यासाठी सहाय्यता निधी जमा करण्याचा आहे. Youtube वर दिलेल्या माहितीनुसार, 'We are one' अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलमध्ये जमा होणारी रक्कम COVID-19 रिलीफ फंडसाठी दिली जाणार आहे. 'We are one' अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला आपल्याला Youtube वर चॅनल सब्सक्राइब करावे लागणार आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.टॅग्स :यु ट्यूबसिनेमातंत्रज्ञानYouTubecinematechnology