youtube tips n tricks five hidden features of youtube easy to use
YouTube मधील 'हे' हिडन फीचर्स तुम्हाला माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 02:51 PM2019-05-13T14:51:40+5:302019-05-13T15:03:03+5:30Join usJoin usNext यूट्यूब एक लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप असून याच्या मदतीने युजर्स आवडीचे व्हिडीओ पाहू शकतात. यूट्यूबचा वापर हा व्हिडीओ सर्च करण्यासाठी केला जातो. मात्र यामध्ये इतरही काही हिडन फीचर्स आहेत. या फीचर्सच्या मदतीने यूट्यूबचा सहजपणे वापर करता येतो. या फीचर्सबाबत जाणून घेऊया. व्हिडीओ स्पीड Adjust करू शकता यूट्यूबवर अनेकदा व्हिडीओचा स्पीड कमी होत असल्याने काही समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र कधी कधी व्हिडीओमध्ये पाहून काही गोष्टी युजर्स शिकतात. त्यावेळी व्हिडीओचा स्पीड कमी करायचा असतो. अशावेळी एक फीचर असे आहे ज्याच्या मदतीने युजर्स व्हिडीओचा स्पीड Adjust करू शकतात. व्हिडीओचा स्पीड Adjust करण्यासाठी ‘Settings’ टॅबमध्ये ‘Speed’ हा पर्याय निवडा. याच्या मदतीने YouTube व्हिडीओचा स्पीड 50 किंवा 25 टक्के स्लो करता येईल. तसेच या फीचरच्या मदतीने व्हिडीओचा स्पीड वाढवता येतो. GIF क्रिएट करू शकता युजर्स यूट्यूब व्हिडीओच्या कोणत्याही भागाचा GIF तयार करू शकतात. त्यासाठी तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ ओपन करा. त्यानंतर व्हिडीओच्या URL मध्ये Youtube च्या आधी GIF हा शब्द लिहा. ते साधारण gifyoutube.com अशा पद्धतीने दिसेल. यानंतर युजर्स समोर एक आणखी पेज ओपन होईल. जेथे युजर्स व्हिडीओतील हवा असलेला भाग सिलेक्ट करू शकतात. 15 सेकंदापर्यंत क्लिप तयार करता येते. त्यानंतर तो व्हिडीओ GIF मध्ये कन्वर्ट होईल. यूट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करता येतो यूट्यूबवरून युजर्स त्यांना हवा असलेला व्हिडीओ डाऊनलोड करू शकतात. व्हिडीओच्या URL मध्ये www. नंतर ‘ss’ असं टाईप करा. यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. जेथून व्हिडीओ डाऊनलोड करता येतो. व्हिडीओतील खास भाग शेअर करता येतो यूट्यूबवरील व्हिडीओ पाहताना एखादा भाग जास्त आवडतो. त्यामुळे तो मित्रमैत्रिणींसोबत शेअर करण्याची युजर्सना इच्छा असते. या फीचरच्या मदतीने युजर्स तो खास भाग शेअर करू शकतात. व्हिडीओच्या URL च्या शेवटी #t= असं लिहा. तसेच यामध्ये मिनिट आणि सेकंदाचा समावेश करा. जे ‘m’ आणि ‘s’ असं दर्शवलेलं असेल. म्हणजेच URL ही ‘#t=08m15s अशा प्रकारे दिसेल. ऑफलाईन व्हिडीओ पाहता येईल यूट्यूबवर आवडलेले व्हिडीओ सेव्ह करून नंतर ऑफलाईन मोडमध्ये पाहता येईल. यासाठी व्हिडीओ खाली देण्यात आलेल्या अॅरोवर क्लिक करा यामुळे व्हिडीओ सेव्ह होईल. मात्र याचा वापर हा केवळ स्मार्टफोनमध्येच करता येईल. टॅग्स :यु ट्यूबतंत्रज्ञानYouTubetechnology