जगातील सर्वात छोटा 3G फोन पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 03:30 PM2020-01-25T15:30:39+5:302020-01-25T15:47:32+5:30

जगातील सर्वात छोटा 3G फोन लाँच करण्यात आला आहे. फोन तयार करणाऱ्या जिनी मोबाईल्सने (Zini Mobiles) सर्वात छोट्या फोनसाठी किकस्टार्टर कँपेन लाँच केलं आहे.

Zanco tiny t2 असं जगातील सर्वात छोट्या 3G फोनचं नाव असून यामध्ये सर्व फंक्शन उपलब्ध असणार आहेत.

31 ग्रॅम वजनाचा हा फोन आहे. एप्रिल 2020 पासून या डिव्हाईसची शिपिंग सुरू होणार आहे.

फोनमध्ये युजर्सना कॅमेरा, व्हिडीओ रिकॉर्डिंग, MP3 आणि MP4 प्लेबॅक, गेम्स, कॅलेंडर आणि एफएम रेडीओ मिळणार आहे.

छोट्या 3G फोनच्या मदतीने युजर्स कॉल करू शकतात. तसेच टेक्स्ट मेसेजही पाठवू शकतात.

कॅलेंडर आणि अलार्म क्लॉक मॅनेजचा ऑप्शनही यामध्ये देण्यात आला आहे.

31 ग्रॅम वजनाच्या जगातील सर्वात छोट्या फोनमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि एसओएस मेसेज फंक्शन देण्यात आले आहे.

कंपनीने फोनमध्ये 32GB पर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

फोन एकदा चार्ज केल्यानंतर युजर्सना सात दिवसांचा स्टँडबाय वेळ मिळणार आहे.

कॅल्क्यूलेटर, फाईल मॅनेजर, टास्क मॅनेजर आणि नोटपॅड सारख्या अनेक गोष्टींचा फोनमध्ये समावेश आहे.