Zoom अॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 14:46 IST2020-05-01T14:32:55+5:302020-05-01T14:46:13+5:30
लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अॅप नंबर वन ठरलं आहे. ऑफिसच्या मीटिंगसाठी अनेकजण व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अॅप असलेल्या Zoom चा वापर करत आहेत.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सोशल मीडियाचा वापर हा घरबसल्या मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.
लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अॅप नंबर वन ठरलं आहे. ऑफिसच्या मीटिंगसाठी अनेकजण व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अॅप असलेल्या Zoom चा वापर करत आहेत.
काही दिवसांपूर्वी झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आल्याची आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात असल्याची माहिती समोर आली.
झूम अॅपचा डेटा लीक झाल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण काळजी करू नका कारण काही सोप्या पद्धतीने प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षित ठेवता येतो.
4 महिन्यात जवळपास झूमचे 20 पटीने युजर्स वाढले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये झुमचा युजर बेस 10 मिलियन होता तो मार्च 2020 ला 200 मिलियन झालेला आहे.
लॉकडाऊनमध्ये झुमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे . याच दरम्यान आपला डेटा सेफ कसा ठेवायचा जाणून घेऊया.
मिटिंगसाठी पासवर्डचा वापर करा
हॅकरपासून वाचण्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. मिटिंगसाठी पासवर्डचा वापर करा यामुळे डेटा सुरक्षित राहील.
वेटिंग रूम्स फीचरचा वापर करा
वेटिंग रूम फीचरच्या मदतीने अॅडमीन मिटिंगमध्ये सामील होणाऱ्या लोकांना कंट्रोल करू शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तील मिटिंगचा अॅक्सेस देऊ शकतो.
जॉईन बिफोर होस्ट ऑप्शन डिसेबल करा
या फीचरच्या मदतीने नको असलेल्या व्यक्तीला मिटिंगमध्ये सामील होण्यापासून रोखू शकतात. म्हणजेच होस्टच्या आधी कोणीही मिटिंग जॉईन करू शकत नाही.
मिटिंग लॉक करा
झूमवर मिटिंग लॉक करण्याच्या देखील ऑप्शन देण्यात आला आहे. यामुळे मिटिंग सुरक्षितरित्या करता येते.
रिमूव्हड पार्टीसिपेटला रिजॉईन करण्यापासून रोखा
अॅडमिनने एखाद्या व्यक्तीला मिटिंगमधून रिमूव्ह केलं असेल तर झूमवर त्याला रिजॉईन करण्यापासून रोखण्याचा देखील पर्याय आहे
झूमच्या फ्री व्हर्जनमधील कॉलमध्ये एकाचवेळी 100 लोक जोडले जाऊ शकतात.
प्रोफेशनल शिवाय युजर्स या अॅपचा वापर हा पर्सनल कॉलसाठी देखील करीत आहेत.
झूम अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सोपे युजर इंटरफेस आहे. तसेच या अॅपमध्ये युजर्सना अनेक फीचर देण्यात आले आहेत.