Chala Hawa Yeu Dya फेम श्रेया बुगडेचा नवरा काय करतो माहितीय ? तो ही आहे तितकाच प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:55 AM2022-01-07T11:55:56+5:302022-01-07T12:04:42+5:30

Chala Hawa Yeu Dya या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. या शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike), सागर कारंडे (Sagar Karande), भाऊ कदम (Bhau Kadam), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), डॉ. निलेश साबळे( Dr. Nilesh Sable) यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

या विनोदवीरांमध्ये आणखी एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे.

महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात.

सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात.

या दोघांची रिअर लाइफ लव्हस्टोरी सिनेमापेक्षा कमी नाहीय. श्रेयाच्या इन्स्टाग्रामो अकाउंटवर ती निखिलसोबत अनेक फोटो शेअर करत असते.

मराठी कुटुंबात जन्मलेली श्रेया गुजराती कुटुंबाची सून आहे. २७ डिसेंबर २०१४ रोजी श्रेया रेशीमगाठीत अडकली.निखील सेठसह श्रेयाचं शुभमंगल पार पडलं होतं.

सध्या आपल्या संसारात श्रेया खुश असून 'चला हवा येऊ द्या' या शोच्या माध्यमातून करिअरमध्येही यशाची नवी उंची गाठली आहे.

श्रेया आणि निखिल यांचे लव्ह मॅरेज आहे.एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती.

त्याकाळात निखिलचे घरचे त्याच्या लग्नासाठी मुली शोधत होते. एकेदिवशी निखिलने श्रेया तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला.

त्यावर श्रेयाने हो उत्तर दिल्यानंतर निखिलने तिला लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या सहमतीने दोघांचे लग्न झाले.

निखिलचे हे लव्ह अॅट फर्स्ट साइट होते. तर श्रेयासाठी हे मुळीच लव्ह अॅट फर्स्ट साइट नव्हते.

श्रेयाप्रमाणेच निखिलचेही एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीसोबत घट्ट नाते आहे.अनेक मराठी मालिकांची निर्मिती निखिलने केली आहे.