'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अवलीच्या रिअल लाइफ पावलीला पाहिलंय का? राहते अत्यंत साधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 17:50 IST2023-06-11T17:38:18+5:302023-06-11T17:50:05+5:30

Prasad khandekar: प्रसाद खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा असून त्याची पत्नीदेखील तितकीच साधी आहे.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा

या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

या कार्यक्रमातील अवली लवली कोहली फॅमिलीचं स्किट् प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

यात सध्या नेटकऱ्यांमध्ये लवलीची म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर याची चर्चा रंगली आहे.

प्रसाद खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा असून त्याची पत्नीदेखील तितकीच साधी आहे.

प्रसादच्या पत्नीचं नाव अल्पा खांडेकर असं आहे.

अल्पाचा स्वत:चा व्यवसाय असून ती केक, चॉकलेट्स करते आणि त्याच्या ऑर्डसही घेते.

अल्पा सोशल मीडियापासून लांब आहे. मात्र, प्रसाद कायम तिच्यासोबतचे फोटो शेअर करत असतो.

अल्पा आणि प्रसाद यांना एक मुलगादेखील आहे.