Myra Vaikul : छान किती दिसते! छोट्या परीचा क्यूट अंदाज, मावशीच्या लग्नात मायराचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 04:46 PM2023-02-02T16:46:12+5:302023-02-02T16:50:57+5:30

छोटी परी म्हणजेच मायरा वायकूळच्या फोटोशूटची कायमच चर्चा असते.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून प्रसिद्धीस आलेली छोटी परी म्हणजेच मायरा वायकूळचे इतक्या लहान वयातच खूप चाहते आहेत.

तिचे क्यूट फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात. इतक्या कमी वयात ती अगदी प्रोफेशनल असल्यासारखे फोटोशूट करते.

सध्या मायरा कुटुंबासोबत नाशिकला गेली आहे. तिच्या कुटुंबात लग्नसोहळा असल्याने ती नाशिकमध्ये एंजॉय करत आहे.

मायराचे मेहंदी फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. अगदी निरागस, सोज्वळ असा तिचा लुक दिसून येतोय.

हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस तिने परिधान केला आहे. पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. केसांना दोन क्लिप्स लावल्या आहेत.

मायरा अगदी तिच्या आईसारखी दिसत असल्याची कमेंट नेटकरी करत आहेत. तिच्या फोटोंवर कायमच चाहते घायाळ होतात.

मायराने फोटोसाठी दिलेल्या पोज सुद्धा अतिशय गोड आहेत. मोठ्या अभिनेत्री देतात तशा काहीशा पोज तिने दिल्याचं दिसतं.

मायराची गोड स्माईल, तिचा क्युट चेहरा आणि सुंदर ड्रेसमध्ये तिच्यावरुन नजरच हटणार नाही.

आता लग्नाचे आणखी फोटो कधी येतात याकडे मायराच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.