चिमुकल्या मायराचे रिअल लाइफ आई-वडील कोण माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 10:37 IST2021-09-05T10:25:50+5:302021-09-05T10:37:11+5:30
Mayra vaykul :बालकलाकार म्हणून काम करणारी मायरा सोशल मीडियावर प्रसिद्ध असून तिचे इन्स्टाग्राम आणि युट्युबवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे.
या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे,श्रेयस तळपदे हे मुख्य भूमिकेत असून मायरा वायकुळ ही चिमुकली बालकलाकाराची भूमिका साकारत आहे.
या मालिकेत मायरा, परी ही व्यक्तीरेखा साकारत असून कमी कालावधीत ती तुफान लोकप्रिय झाली आहे.
बालकलाकार म्हणून काम करणारी मायरा सोशल मीडियावर प्रसिद्ध असून तिचे इन्स्टाग्राम आणि युट्युबवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत.
कमी वयात लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या मायराचे रिअल लाइफ आई-वडील कोण हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मायराच्या आईचं नाव श्वेता थोरात वायकुळ असं असून वडिलांचं नाव गौरव वायकुळ आहे.
मायराचे आई-वडील सतत तिला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळेच मायरा आज नेटकऱ्यांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे.