IN PICS : 20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:53 AM2022-12-25T10:53:15+5:302022-12-25T10:59:53+5:30

Tunisha Sharma Death : तुनिषा काल मालिकेच्या सेटवर आली, सगळ्यांची भेटली बोलली आणि अचानक तिने मृत्युला कवटाळलं. सेटवरच 20 वर्षाच्या तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली...

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा आज आपल्यात नाही. काल अवघ्या 20 वर्षाच्या तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली.

तुनिषा काल मालिकेच्या सेटवर आली, सगळ्यांची भेटली बोलली आणि अचानक सेटवरच तिने मृत्युला कवटाळलं.

येत्या 4 जानेवारीला तुनिषाचा वाढदिवस होता. ती 21 वर्षांची होणार होती, पण त्याआधीच तिने जगातून एक्झिट घेतली.

तुनिषा ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत मुख्य भुमिकेत होती. या मालिकेनं तिला अपार लोकप्रिय मिळवून दिली.

तुनिषा चंदीगडमध्ये जन्मली. तिथेच शिकली आणि मग अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आली. इथे येऊन तिने केवळ नावचं नाही तर संपत्तीही कमावली.

रिपोर्टनुसार, आपल्या छोट्याशा करिअरमध्ये तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. अगदी फितूर, बार बार देखो, कहानी 2, दबंग 3 अशा अनेक सिनेमातही तिने छोट्या छोट्या भूमिका साकारली.

रिपोर्टनुसार, 20 वर्षाची तुनिषा कोट्यवधी रूपयांची मालकीण होती. ती 2 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 15 कोटींच्या संपत्तीची मालकीण होती.

अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा शर्मा तिच्या आलिशान घराची मालकिन होती. तुनिषाच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अलिशान गाड्यांमधून ती फिरायची.

तुनिषाला लहानपणापासूनच डान्स आणि अ‍ॅक्टिंगची आवड होती. ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या मालिकेतून तिने डेब्यू केला होता.

इंटरनेटवाला लव्ह, शेर ए पंजाब महाराजा रंजीत सिंह, इश्क सुभानअल्लाह अशा मालिकांत तिने काम केलं होतं.