Ex-Wimbledon champ Ilie Nastase, 73, marries FIFTH wife who is 30 years his junior
अरे देवा: विम्बल्डन विजेता 73 व्या वर्षी चढला बोहल्यावर; 30 वर्षांनी लहान आहे पाचवी पत्नी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:58 PM2020-06-10T14:58:29+5:302020-06-10T15:06:20+5:30Join usJoin usNext विम्बल्डनचा माजी विजेता एली नॅस्टासे यानं मंगळवारी पुन्हा एकदा लग्न केलं. 73 वर्षीय नॅस्टासेचं हे पाचवं लग्न आहे आणि त्याची पत्नी त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. रोमानियाच्या कोस्टांटा येथे अगदी साधेपणानं नॅस्टासे आणि आयओना सिमिओना यांचा विवाह झाला. त्यांच्या या लग्नाला मोजकाच मित्रपरिवार उपस्थित होता. नॅस्टासेनं सांगितले की,''अगदी साधेपणानं आम्ही हे लग्न केलं. कोणताही गाजावाजा न करता आम्हाला लग्न करायचे होते. माझ्या पत्नीलाही हेच हवं होतं.'' सप्टेंबर 2018मध्ये माजी टेनिसपटूनं चौथी पत्नी ब्रिगीट स्फॅट हीच्याशी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून नॅस्टासे व सिमिओना यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यांच्या लग्नाला रोमानियाचा माजी फुटबॉलपटू सिप्रियन मारीका आणि त्याची पत्नी उपस्थित होती. नॅस्टासेनं सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यानं यापूर्वी डोमिनिक ग्रेसिया (1972-1980), अॅलेक्झांड्रा किंग, अमालिया नॅस्टासे आणि स्फॅट यांच्याशी विवाह केला होता. आधीच्या पत्नींपासून त्याला चार मुली व दोन मुलं आहेत. नॅस्टासेनं 1973मध्ये विम्बल्डनचे दुहेरी जेतेपद, 1970 व 72मघ्ये मिश्र गटाचे जेतेपद जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी फ्रेंच ओपन व अमेरिकेन ओपन स्पर्धा जिंकली आहेत. 1972मध्ये नाईकेनं करारबद्ध केलेला तो पहिला व्यावसायिक क्रीडापटू होता. 2017मध्ये रोमानियन संघाचे फेड कप स्पर्धेत नेतृत्व करताना त्यानं शिविगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर बंदी घातली गेली. टॅग्स :टेनिसविम्बल्डनTennisWimbledon