Hamee named for the 20th Grand Slam Trophy after winning the Australian Open
फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून २०व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर कोरलं नाव By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 11:35 PM2018-01-28T23:35:34+5:302018-01-28T23:38:19+5:30Join usJoin usNext टेनिसचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयाचा 'षटकार' लगावून स्वित्झर्लंडच्या ३६ वर्षीय फेडररनं कारकिर्दीतील विक्रमी २०व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर नाव कोरलं. तब्बल तीन तास चाललेल्या झंझावाती सामन्यात क्रोएशियाच्या मारीन चिलिचवर फेडररने ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ अशी मात केली. सार्वकालिक महान टेनिसपटूंच्या यादीत रॉजर फेडररनं मानाचं स्थान मिळवलं आहे. २०१७ मध्ये, वयाच्या ३५ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन अशा दोन स्पर्धा जिंकण्याची किमया करून त्यानं टेनिसप्रेमींना अक्षरशः 'याड' लावलं होतं. . वयासोबत फेडररचा खेळ अधिकाधिक उंचावत चालल्याचं यंदाच्या मोसमातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून पुन्हा स्पष्ट झालंय.