I don’t know when my son will be able to see his father again, Sania Mirza svg
पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:31 AM2020-05-16T11:31:08+5:302020-05-16T11:34:32+5:30Join usJoin usNext भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आपल्या कुटुंबीयांसह हैदराबाद येथे आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेतच, शिवाय खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. अशात सानियाला एक चिंता सतावत आहे. तिचा मुलगा इझानला त्याच्या बाबांचा म्हणजे शोएब मलिकचा चेहरा कधी पाहायला मिळेल, ही चिंता तिला सतावत आहे. सानिया आणि शोएब दोन वेगवेगळ्या देशांत लॉकडाऊन झाले आहेत. पाकिस्तानचा क्रिकेटपटू मलिक त्याच्या आईसह पाकिस्तानातील सियालकोट येथे आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सानियानं ही चिंता व्यक्त केली. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी सानिया अमेरिकेत होती. त्यानंतर फेड कप प्ले ऑफमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सानिया इंडियान वेल्स टूर्नामेंटसाठी अमेरिकेला गेली होती. तिथे गेल्यावर ती स्पर्धा रद्द झाल्याचे तिला समजले. त्यानंतर ती भारतात परतली आणि त्याकाळात शोएब पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत होता. सानिया म्हणाली,''शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे आणि मी इथे. हा आमच्यासाठी कठीण प्रसंग आहे, कारण आमचा एक लहान मुलगा आहे. इझान त्याच्या बाबांना पुन्हा कधी बघू शकेल, हेही मला माहीत नाही. आम्ही दोघं सकारात्मक विचार करणारे आहोत. शोएब त्याच्या 65 वर्षीय आईसोबत सियालकोट येथे आहे आणि आता त्यांना शोएबची जास्त गरज आहे. आम्हाला जे योग्य वाटले, तेच आम्ही केलं. या संकटातून आपण लवकर बाहेर पडू, अशी मला आशा आहे.'' या काळात केवळ कुटुंबाचा विचार करत असल्याचे सानियानं सांगितले. ती म्हणाली,''मला अन्य गोष्टींची जास्त चिंता नसते. पण, काही दिवसांपूर्वी भविष्याचा विचार करून मी घाबरली होती. घरी लहान मुलगा आणि म्हातारे आई-वडिल असताना आपण त्यांच्याबद्दलच विचार करतो. काम आणि टेनिस याचा विचारही डोक्यात येत नाही.''Read in Englishटॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिककोरोना वायरस बातम्याSania MirzaShoaib Malikcorona virus