नमस्ते London : ब्रिटीश टेनिसपटूच्या प्रेमात भारताचा स्टार; दुसऱ्यांदा केलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:34 IST2019-11-27T13:31:18+5:302019-11-27T13:34:30+5:30

आशियाई स्पर्धेतील ( 2018) सुवर्णपदक विजेत्या भारतीय टेनिसपटू दिवीज शरण यानं ब्रिटीश टेनिस खेळाडू समांथा मरे हिच्याशी भारतीय पारंपरिक पद्धतीत विवाह केला.

समांथानं आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या स्पर्धेत तीन एकेरी आणि 20 दुहेरी जेतेपदं पटकावली आहेत. दिवीजनं 21 जुलै 2019मध्ये समांथाशी विवाह केला होता. पण, हा विवाह समांथाच्या पारंपरिक पद्धतीनं विवाह झाला होता.

पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.

टॅग्स :टेनिसTennis