Japan's Tennis Revolution
जपानची टेनिस क्रांती By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:15 PM2018-09-06T12:15:28+5:302018-09-06T12:17:58+5:30Join usJoin usNext केई निशिकोरी आणि नाओमी ओसाका यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत जपानच्या महिला व पुरुष खेळाडूने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. निशिकोरीने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात माजी विजेत्या मरिन सिलिचचा 2-6, 6-4, 7-6(7/5), 4-6, 6-4 अशा रोमहर्षक विजय मिळवला. 2014च्या अंतिम फेरीत सिलिचने निशिकोरीला पराभूत केले होते. ओसाकाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या लेसिया त्सुरेंकोवर 6-1, 6-1 असा पराभव केला. 20 वर्षीय ओसाका ही ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारी 1996नंतर पहिली जपानी महिला खेळाडू आहे. किमिको डेट ही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारी अखेरची महिला होती. निशिकोरीने तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी त्याने 2014 व 2016 मध्ये ही भरारी घेतली होती. टॅग्स :अमेरिकन ओपन टेनिसटेनिसUS Open 2018Tennis