Photos: Fashionable Sania Mirza, You will fall in love! svg
Photos: सानिया मिर्झाच्या 'फॅशन'वर जग फिदा; तुम्हीही पडाल प्रेमात! By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:39 PM2020-05-15T16:39:28+5:302020-05-15T16:44:29+5:30Join usJoin usNext भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा तिच्या खेळासह फॅशनमुळेही अधिक चर्चेत राहिली आहे. सानिया मिर्झावर नेटिझन्सकडून सातत्यानं टीका होत राहिली. पण, तिनं त्याचा तिच्या खेळावर आणि वैयक्तिक आयुष्यावर कधीच परिणाम होऊ दिला नाही. तिन टेनिस खेळायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या कपड्यांवरून अनेकांनी टीका केली. पण, सानियानं यशाची ऐकेक शिखरं पादाक्रांत करून टीकाकारांची तोंड बंद केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्यासोबतच्या विवाहाच्या निर्णयानं अनेकांच्या भूवया उंचावल्या. तिच्यावर देशद्रोही अशी टीकाही करण्यात आली, परंतु ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. शोएब मलिकसोबतचा तिचा संसार सुखात सुरू आहे आणि या दोघांना एक मुलगाही आहे. नुकतंच सानियाला फेड कप हार्ट पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. पुरस्काररुपी मिळालेली 2000 डॉलरची रक्कम तिनं तेलंगणा सहकारला कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी दान केली. लोक काय म्हणतील, या विचारानं भारतातील अनेकांची स्वप्न धुळीस मिळतात, असं विधान तिनं केलं होतं. तिच्या या विधानावरही अनेकांनी टीका केली. टेनिस कोर्ट गाजवणाऱ्या सानियानं फॅशनमध्येही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटिंना टक्कर दिली आहे. तिचे फॅशनेबल फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळाली आहे. सानियानं सहा ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केली आहेत. ही सहा जेतेपदं तिनं दुहेरी प्रकारात पटकावली आहेत.टॅग्स :सानिया मिर्झाटेनिसSania MirzaTennis