Sania Mirza becomes first Indian to be nominated for Fed Cup Heart award svg
Sania Mirza ला मिळाली आनंदाची बातमी; म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खास! By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 11:03 AM2020-05-01T11:03:18+5:302020-05-01T11:07:21+5:30Join usJoin usNext भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासाठी गुरुवारचा दिवस खास बनला. 2003पासून भारतीय टेनिस विश्वास आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला फेड चषक हार्ट पुरस्कारासाठी (Fed Cup Heart Award) नामांकन मिळालं आहे. पुरस्कारासाठी नामांकित झालेली सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सानियानं आशिया/ओशियानिक विभागातून इंडोनिशियाच्या प्रिस्का मेडेलिन नुग्रोहो हिच्यासह सानियाला नामांकन देण्यात आले आहे. सानियानं नुकतीच चार वर्षांनंतर फेड चषक स्पर्धेत पुनरागमन केले होते. या सामना खेळताना प्रेक्षकांमध्ये तिचा 18 महिन्यांचा मुलगा इजहानही उपस्थित होता. भारताला सर्वात प्रथम फेड चषक स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवून देण्यात सानियानं महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अखित भारतीय टेनिस महासंघाच्या प्रेस रिलीजमध्ये सानियानं म्हटलं की,''2003मध्ये मी पहिल्यांदा टीम इंडियाच्या जर्सीत कोर्टवर उतरली होती आणि तो दिवस माझ्यासाठी गौरवशाली होता. आतापर्यंत 18 वर्षांचा प्रवास झाला आहे.'' ती पुढे म्हणाली,''फेड चषकमध्ये आशिया/ओशियाना स्पर्धेतील मिळवलेला विजय हा आयुष्यातील सर्वात मोठं यशापैकी एक आहे. मला फेड कप हार्ट पुरस्कारासाठी नामांकन दिल्याबद्दल आभारी. हा क्षण माझ्यासाठी खास आहे.'' तीन विभागातून सहा खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत. युरोप/आफ्रिका विभागातून अॅनेट्ट कोंटावेट ( इस्टोनिया) आणि एलेओनोरा मोलिनारो ( लक्सेमबर्ग); अमेरिकन विभागातून पॅराग्वेच्या व्हेरोनिका केपेडे रॉय, मेस्किकोच्या फर्नांडा कोट्रेरास गोमेज यांनाही नामांकन मिळाले आहेत. विजेता निवडण्यासाठी 1 ते 8 मे या कालावधीत मतदान करावं लागणार आहे.टॅग्स :सानिया मिर्झाटेनिसSania MirzaTennis