Sania Mirza connection with four cricket captains svg
Sania Mirza चं शोएब मलिकसह 'या' चार कर्णधारांशी Cricket Connection! By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:13 PM2020-05-09T16:13:26+5:302020-05-09T16:16:19+5:30Join usJoin usNext भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे कुटुंबीय क्रिकेटचे चाहते आहेत. नुकतंच तिनं दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जर मी मुलगा असते तर मला क्रिकेटपटू बनावं लागलं असतं. सानिया मिर्झाचे वडील इमरान मिर्झा मुंबईत क्लब क्रिकेट खेळायचे, त्यांच्याशिवाय सानियाच्या कुटुंबात चार व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी आपापल्या देशाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. सानियानं 2010मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकशी विवाह केला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं तीन कसोटी, 41 वन डे आणि 20 ट्वेंटी-20 सामन्यांत संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. सानियाची लहान बहिण अनम मिर्झाचा नुकताच विवाह झाला. भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असद याच्याशी तिनं लग्न केलं. सानियाचे काका गुलाम अहमद यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी 1955-1959 या कालावधीत भारतासाठी तीन कसोटी सामन्यांत कर्णधाराची जबाबदारीही पार पाडली आहे. सानियाची आजी आणि गुलाम अहमद यांची सासू या सख्या बहिणी होत्या. पाकिस्तानचे माजी कर्णधार आसिफ इक्बाल हे सानियाचे नातेवाईक आहेत. गुलाम अहमद यांचा तो भाचा.. 1961मध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि भारताविरुद्ध सहा कसोटी सामन्यांत त्यांनी पाकिस्तान संघाचे नेतृत्व सांभाळले. टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकSania MirzaShoaib Malik