Sania Mirza donates signed memorabilia for special corona Virus relief auction in Pakistan svg
भारतापाठोपाठ Sania Mirzaची पाकिस्तानलाही मदत; गरजूंसाठी केलं मोठं दान! By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:14 AM2020-05-20T10:14:33+5:302020-05-20T10:19:21+5:30Join usJoin usNext भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी एका फाऊंडेशनच्या सहकार्यांनं हैदराबाद येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू व्यक्तिंसाठी टेनिसपटू सानिया मिर्झानं एक चळवळ उभी केली होती. त्यातून तिनं एका आठवड्यात 1.25 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. या निधीतून जवळपास 1 लाख लोकांना मदत करता येणार आहे. सानियाला नुकतंच फेड कप हार्ट पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. या पुरस्कारासह मिळालेली बक्षीस रक्कमही सानियानं हैदराबाद सरकारला दान केली. सानियानं आता पाकिस्तानातील गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊनमुळे तेथेही अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी सानियानं दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार सानियाच नव्हेत तर राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि मारिया शारापोव्हा यांनीही Stars Against Hunger या चळवळीत त्यांची स्वाक्षरी असलेल्या काही वस्तू लिलाव करण्यासाठी दिल्या आहेत. राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांच्याप्रमाणे सानियानंही या चळवळीसाठी तिची स्वाक्षरी असलेल्या वस्तू लिलावासाठी दान केल्या आहेत. पाकिस्तानचा टेनिसपटू एैसाम-उल-हक कुरेशी यानं ही चळवळ सुरू केली आहे. या चळवळीतून उभा राहणाऱ्या निधीतून पाकिस्तानमधील गरीब कुटुंबांना रेशन पुरवण्यात येणार आहे. कुरेशीनं या चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल फेडरर आणि मिर्झा यांचे आभार मानले आहे. कुरेशी म्हणाला,''खेळाडू म्हणून देशासाठी काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करत आहे.'' या मोहिमेत शोएब मलिक, वसीम अक्रम यांनीही हातभार लावला आहे.टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यासानिया मिर्झारॉजर फेडररनोव्हाक जोकोव्हिचशोएब मलिकCoronaVirus Positive NewsSania MirzaRoger fedrerNovak DjokovicShoaib Malik