Sania Mirza, sister Anam, share pictures from bride-to-be's mehndi ceremony
सानियाची बहिणही होणार क्रिकेपटूची पत्नी, पाहा मेहंदी सोहळ्याचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 03:20 PM2019-12-10T15:20:15+5:302019-12-10T15:23:31+5:30Join usJoin usNext सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झा क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध आहेत. हैदरबाद येथील एका हॉटेलमध्ये सानिया मिर्झाच्या बहीणीचा मेहंदी सोहळा पार पडला. असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. लवकरच अनम आणि असद लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी सानिया आणि अनम मैत्रीणींसह नुकतेच पॅरीसमधून बॅचलर पार्टी करून परत आले. पहिला पती अकबर रशीदकडून काडीमोड घेण्यासाठी अनमने गतवर्षी कोर्टात केस दाखल केली आहे. 18 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा आणि हैदराबादचा उद्योगपती अकबर यांचा विवाह झाला होता. आता अनम पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सानियानं बहीणीच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकSania MirzaShoaib Malik