Sania Mirza's sister Anam set to marry Azharuddin's son Asad
सानिया मिर्झाची बहीण क्रिकेटपटूच्या मुलाच्या प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:34 PM2019-03-11T18:34:10+5:302019-03-11T18:40:04+5:30Join usJoin usNext भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला आणि या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झा क्रिकेटपटूच्या मुलाच्या प्रेमात पडल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत आणि ही दोघं लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. काही दिवसांपूर्वी असदने इस्टाग्रामवर अनमसोबतचा फोटो शेअर केला होता. सानियानेही असदसोबत एक फोटो शेअर करून 'Family' असे लिहीले होते. पती अकबर रशीदकडून काडीमोड घेण्यासाठी अनमने गतवर्षी कोर्टात केस दाखल केली आहे. 18 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा आणि हैदराबादचा उद्योगपती अकबर यांचा विवाह झाला होता. टॅग्स :सानिया मिर्झाटेनिसSania MirzaTennis