Spain’s Rafael Nadal's Rs 7.3 cr watch now the talk of French Open
French Open स्पर्धेत राफेल नदालच्या घड्याळाची एकच चर्चा...'एवढी' आहे किंमत! By स्वदेश घाणेकर | Published: October 3, 2020 03:28 PM2020-10-03T15:28:07+5:302020-10-03T15:30:22+5:30Join usJoin usNext फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे सर्वाधिक 12 जेतेपद नावावर असणारा राफेल नदाल ( Rafael Nadal) आणखी एकदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात प्रेक्षकांना ही स्पर्धा स्टेडियममधून पाहता येत नसली तरी त्याचे थेट प्रक्षेपण पाहिले जात आहे. यंदाच्या या स्पर्धेतही नदाल हाच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण, त्याच्यासमोर नोव्हाक जोकोव्हिच कडवे आव्हान उभे करू शकतो. पण, सध्या French Open मध्ये चर्चा रंगलीय ती नदालच्या घड्याळाची... तो जेव्हा कोर्टवर उतरला, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्या घड्याळाकडे आकर्षित झाली. त्याचे हे घड्याळ 7.3 कोटींचे आहे. विश्वास बसन नाही ना? पण, हे खरं आहे. रिचर्ड मायली ( Richard Mille) कंपनीचे हे घड्याळ आहे. त्याची किंमत 10, 00, 500 डॉलर इतकी असून अशी केवळ 50 घड्याळं आहेत.. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंमध्ये नदालनं 27वे स्थान पटकावले आहे. Nike, Swiss brand Richard Mille आदी अनेक कंपन्यांचा तो सदिच्छादूत आहे. Read in Englishटॅग्स :टेनिसराफेल नदालTennisRafael Nadal